जयालक्ष्मी मोठी गायिका होईल - लता मंगेशकर

लिटिल लता मंगेशकर उशी उपमा मिळालेली 'सरस्वती' असे नाव दिलेली जयालक्ष्मी मोठी गायिका होईल. ती चांगली गात आहे, असे कौतुक करुन ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी तिला आशीर्वाद दिला.

Updated: Nov 25, 2014, 01:57 PM IST
जयालक्ष्मी  मोठी गायिका होईल - लता मंगेशकर title=

मुंबई : लिटिल लता मंगेशकर उशी उपमा मिळालेली 'सरस्वती' असे नाव दिलेली जयालक्ष्मी मोठी गायिका होईल. ती चांगली गात आहे, असे कौतुक करुन ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी तिला आशीर्वाद दिला.

माझा तिला आर्शीवाद आहे, असे लता मंगेशकर यांनी सांगताच जयालक्ष्मीच्या आईच्या डोळ्यात आनंदाअश्रु आलेत. लता मंगेशकर यांनी आर्शीवाद दिल्याने मी धन्य झाले आहे, असे तिच्या आईने सांगितले.

झी मीडियाने 'सरस्वती' नान देऊन तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यात यशही आले. आज जयालक्ष्मी ही जगासमोर आली आहे. तिला गाण्यासाठी ऑफरही आल्या आहेत. लता मंगेशकर, सुदेश भोसले यांच्यासह अन्य गायकांनी तिला मदत देऊ केलीआहे.

तिला जी काही मदत हवी असेल तर ती मी करण्यास तयार आहे, असे गायक सुदेश भोसले यांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.