पाकिस्तानी गायिकेचा 'सेल्फी' वायरल आणि शिव्यांची लाखोली

प्रसिद्ध पाकिस्तानी गायिका कोमल रिजवी सध्या सोशल वेबसाईट फेसबुकवर लोकांच्या रागाचा आणि मस्करीचा विषय ठरलीय. निमित्त आहे ते तिनं आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केलेला 'सेल्फी'...

Updated: Jul 7, 2015, 10:10 AM IST
पाकिस्तानी गायिकेचा 'सेल्फी' वायरल आणि शिव्यांची लाखोली title=

कराची : प्रसिद्ध पाकिस्तानी गायिका कोमल रिजवी सध्या सोशल वेबसाईट फेसबुकवर लोकांच्या रागाचा आणि मस्करीचा विषय ठरलीय. निमित्त आहे ते तिनं आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केलेला 'सेल्फी'...

सामाजिक कार्यकर्ता अब्दुल सत्तार एधी यांची सध्या तब्येत नाजुक अवस्थेत आहे. ते सध्या एका हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहेत... आणि अशा अवस्थेत कोमलनं त्यांच्यासोबतचा एक सेल्फी फेसबुकवर शेअर केलाय. 

या सेल्फीमध्ये ९० वर्षांचे अब्दुल सत्तार एधी एक बेडवर पहुडलेल्या अवस्थेत दिसत आहेत तर कोमल त्यांच्याशेजारी उभी राहून हसताना दिसतेय. याच सेल्फीमुळे सोशल मीडियावर लोकांनी या गायिकेची चांगलीच खिल्ली उडवलीय. काही जण खूपच नाराजही झालेत. त्यानंतर कोमलनं आपल्या कृत्याचा बचावही करण्याचा प्रयत्न केला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.