कोकण

मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंद

गणपती उत्सवाला कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे. ही बंदी सुरक्षितेच्या दृष्टीने करण्यात आली आहे, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आलेय. १४ सप्टेंबरपासून बंदी करण्यात आली आहे. 

Sep 9, 2015, 09:38 AM IST

औरंगाबाद शहरात स्वाइन फ्लूचा दुसरा बळी

औरंगाबाद शहरात स्वाइन फ्लूचा दुसरा बळी गेलाय. सिडको एन-४ इथल्या महिलेचा स्वाईन फ्लूनं मृत्यू झालाय.

Sep 3, 2015, 09:12 PM IST

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणात स्वाईन फ्लूचं सावट

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वाईन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू झालाय. शिवाय रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतेय. सोनवडेपार आणि नेरुर नदी किनाऱ्यावरच्या दोन गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. 

Sep 3, 2015, 12:23 PM IST

शिवसेना - भाजप युतीत 'केमिकल लोच्या'!

कोकणातल्या केमिकल झोनवरून युती सरकारमध्येच 'केमिकल लोच्या' झालाय. शिवसेनेच्या मंत्र्यांना अंधारात ठेवून, मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्यानं पर्यावरणमंत्री रामदास कदम नाराज झालेत. तर कोकणातूनही या केमिकल झोनला तीव्र विरोध होतोय.

Aug 27, 2015, 09:46 AM IST

पुन्हा एकदा समुद्रात झेपावण्यासाठी नौका सज्ज

कोकणात आजपासून मासेमारीला सुरुवात होतेय. यंदापासून मासेमारीला १ ऑगस्टपासून सुरुवात होतेय...त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर मच्छिमार बांधवांची लगबग पहायला मिळतेय. 

Aug 1, 2015, 10:57 AM IST

राजापूरची गंगा अवतरली, भाविकांची गर्दी

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्ये दहा महिन्यांनी गंगा अवतरली आहे. हे वृत्त समजताच भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केलेय.

Jul 29, 2015, 09:44 AM IST

कोकण रेल्वे मार्गावर २२४ गाड्या, १७ स्टेशनवर सीसीटीव्ही

गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर २२४ गाड्या सोडण्यात येणार आहे. तसेच महत्वाच्या १७ स्टेशनवर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे, अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे.

Jul 28, 2015, 01:27 PM IST

पावसाचं कमबॅक : यावं भाताच्या लावणीला...

यावं भाताच्या लावणीला... 

Jul 22, 2015, 02:59 PM IST