आमदार मारहाणीनंतर सूर्यवंशींची मुंबईबाहेर बदली

आमदार मारहाण प्रकरणातील पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशी यांची मुंबईबाहेर बदली करण्यात आली आहे. वरळी वाहतूक पोलीस शाखेतून सांगलीच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात त्यांची बदली झाली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 9, 2013, 12:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आमदार मारहाण प्रकरणातील पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशी यांची मुंबईबाहेर बदली करण्यात आली आहे. वरळी वाहतूक पोलीस शाखेतून सांगलीच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात त्यांची बदली झाली.
सूर्यवंशी यांची आमदार क्षितिज ठाकूर यांच्याशी मुंबईच्या वरळी सी लिंकवर बाचाबाची झाली होती. त्यानंतर वाद चिघळून सूर्यवंशी यांना विधानभवनात आमदारांकडून मारहाण झाली होती. या प्रकरणी आमदार राम कदम आणि आमदार क्षितिज ठाकूर यांना निलंबित देखील करण्यात आलं होतं.
सचिन सूर्यवंशी यांना मिळालेल्या ऑर्डरवर २४तासांत बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र जोपर्यंत चौकशी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपण कुठेही जाणार नसल्याची प्रतिक्रिया सूर्यवंशी यांनी दिली आहे. बदलीविषयी वाहतूक विभागाच्या अतिरीक्त आयुक्तांशी ते चर्चा करणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.