अशोक सादरे

अशोक सादरेंचं फोन कॉल रेकॉर्डिंग '२४ तास डॉट कॉम'च्या हाती

निलंबित पोलिस अधिकारी अशोक सादरे यांनी आत्महत्या करण्याच्या काही महिन्यापूर्वी हा कॉल रेकॉर्ड केला असावा.

Oct 29, 2015, 11:46 PM IST

अशोक सादरे आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे

(अजित मांढरे, झी २४ तास) राज्यभरात गाजत असलेल्या निलंबित पोलिस अधिकारी अशोक सादरे आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे देण्यात आल्याची माहिती, राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिली आहे.

Oct 29, 2015, 06:41 PM IST

अशोक सादरे यांच्या पत्नीच्या जीवाला धोका

आत्महत्या करणारे पोलिस निरीक्षक अशोक सादरेंच्या पत्नीच्या जीवाला धोका असल्याचा दावा, अशोक सादरेंच्या वकीलांनी केलाय. 

Oct 27, 2015, 04:17 PM IST

जळगावचा 'जयकांत शिखरे' कोण?

सिंघम सिनेमात एक संवाद आहे, जयकांत शिखरे का 'इगो कभी हर्ट नही करने का?' जळगावातील पोलीस अधिकारी अशोक सदरे यांनी नेमका कुणाचा 'इगो हर्ट केला होता, की त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली?

Oct 21, 2015, 12:42 PM IST

जळगावातील हे प्रकरण म्हणजे मुख्यमंत्र्यांसाठी अवघड जागेचं दुखणं?

पोलिस अधिकारी अशोक सादरे यांनी आत्महत्या केली, सुसाईड नोटमध्ये जळगावचे एसपी जालिंदर सुपेकर, पीआय रायते, वाळू माफिया सागर चौधरी यांच्यावर आरोप आहेत, अशोक सादरे यांच्या पत्नीने देखील सुपेकर, रायते आणि वाळू माफिया सागर चौधरीवर आरोप केले आहेत. 

Oct 21, 2015, 12:00 PM IST

... म्हणून अशोक सादरे यांनी आत्महत्या केली, हेच जबाबदार!

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचा विषय लालफितीत अडकला नसता तर अशोक सादरे यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती. २००८मध्ये सुप्रिम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतरही आजतागायत राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना झाली नव्हती. लालफितीत कारभारामुळं अजूनही या समितीला कार्यालय मिळालं नाहीये. माहिती अधिकारात हा धक्कादायक खुलासा झालाय.  

Oct 18, 2015, 10:38 PM IST

नाशिकमध्ये पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांची आत्महत्या

जळगावचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये पोलीस अधिक्षकांचं नाव घेतलं आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आठवडाभरात दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवनप्रवास संपविल्याने पोलीस दलाला हादरा बसलाय.

Oct 17, 2015, 11:29 AM IST

बंदुकीच्या धाकानं व्यावसायिकांकडून खंडणी उकळतायत पोलीस

जळगावमधील रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक सादरे यांनी मस्तकावर रिव्हॉल्वर ठेवून एक लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप वाळू व्यावसायिकाने केल्याने खळबळ उडालीय. पोलीस खात्याची बेअब्रू करणाऱ्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत. 

May 5, 2015, 09:26 PM IST