नाशिक : आत्महत्या करणारे पोलिस निरीक्षक अशोक सादरेंच्या पत्नीच्या जीवाला धोका असल्याचा दावा, अशोक सादरेंच्या वकीलांनी केलाय.
अशोक सादरे यांची एक वैयक्तिक डायरीही गायब झाल्याचं अशोक सादरेंच्या वकीलांचं म्हणणं आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार आणि जाचाला कंटाळून जळगावचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी १६ तारखेला नाशकात राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत त्यांनी वरिष्ठ अधिकारी आणि वाळूठेकेदार यांच्यावर आरोप केलेत. याप्रकरणी जळगावचे पोलिस अधीक्षक जालिंदर सुपेकर आणि पीआय प्रभाकर रायते यांच्यावर आरोप आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.