अशोक सादरेंचं फोन कॉल रेकॉर्डिंग '२४ तास डॉट कॉम'च्या हाती

निलंबित पोलिस अधिकारी अशोक सादरे यांनी आत्महत्या करण्याच्या काही महिन्यापूर्वी हा कॉल रेकॉर्ड केला असावा.

Updated: Oct 30, 2015, 12:01 AM IST

चौकशी सुरू असतांना पोलिस अधिक्षक सुपेकर, पीआय रायते जिल्ह्यातच पदावर का?

मुंबई : निलंबित पोलिस अधिकारी अशोक सादरे यांनी आत्महत्या करण्याच्या काही महिन्यापूर्वी हा कॉल रेकॉर्ड झाल्याचं सांगण्यात येतंय, कारण हॉ कॉल काही महिन्यापूर्वीच व्हॉटस अॅपवरही फिरला होता, पण वेळीच कुणीही याला गंभीरतेने न घेतल्याने, सादरेंना आणखी धक्का बसला असावा का?, कारण या कॉल रेकॉर्डिंगमुळे अशोक सादरे यांच्यामागे काही पोलिस अधिकाऱ्यांनी जाच आणखी वाढवला असेल की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

पोलिस अधिकाऱ्यांचं मनोबल वाढण्यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी महत्वाची आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक जालिंदर सुपेकर आणि पीआय रायते यांना चौकशी होईपर्यंत जिल्ह्याच्या बाहेर ठेवणे गरजेचे झाल्याची चर्चा आहे.

कॉल रेकॉर्डिंगवरून अशोक सादरे डोळ्यात आणखी जास्त खुपत होते?
अशोक सादरे यांनी या कॉल रेकॉर्डमधील चर्चा आपल्या सहकारी अधिकाऱ्यांशी केली आहे. यात जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्याला काय गिफ्ट जातंय, रायते यांच्यामार्फत हे गिफ्ट जात होतं का? असा प्रश्न या कॉल रेकॉर्डिंगवरून उभा ठाकला आहे.

एसपी साहेबांचे सोनेरी लाड पुरवण्यासाठी?
जळगाव पोलिसांचे काही अधिकारी सोन्याचे क्वाईन, जळगाव पोलिस अधिक्षकांसाठी, पीआय रायते यांच्याकडे जमा करत होते. या गिफ्टची पोलिस खात्यातील बित्तंमबातमी बाहेर आल्यानेच त्यांचा जाच वाढला होता का? असे अनेक प्रश्न समोर येत आहेत. 

सर्व सामान्यावर गुन्हा दाखल झाला असता, तर ते मोकाट राहिले असते का?
वाळू माफिया सागर चौधरी आणि जळगावचे पोलिस अधिक्षक जालिंदर सुपेकर, तसेच पीआय रायते यांच्यावर अशोक सादरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत, आरोप केले आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांचं मनोबल वाढवण्यासाठी कारवाई गरजेची

पोलिस अधिक्षक जालिंदर सुपेकर, पीआय रायते यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे आरोप आहेत. पण त्यांना जळगाव जिल्ह्यातून हलवण्याची तसदीही सरकारने घेतलेली नाही, विशेष म्हणजे गृह खाते हे मुख्यमंत्र्यांकडेच असतांना, त्यांच्याकडून तात्काळ या अधिकाऱ्यांना जिल्ह्यातून हटवण्याची कारवाई होणे अपेक्षित होते, कारण सागरे आत्महत्या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष होणे गरजेचे आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.