अतिरेकी हल्ला

अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर हल्ला

अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर स्फोट घडवून आणण्यात आला. सलग दुसऱ्या दिवशी हा हल्ला करण्यात आलाय.

Jan 13, 2016, 01:16 PM IST

इस्तंबूल बॉम्बस्फोटात १० ठार

तुर्कस्तानमधील गजबजलेल्या इस्तंबूल शहराच्या मध्यवर्ती भागात आज शक्तीशाली बॉम्बस्फोट घडवून आणला गेला. या स्फोटात १० नागरिक ठार झालेत.  

Jan 12, 2016, 04:15 PM IST

पठाणकोट अतिरेकी हल्ला आयएसआयने घडवला

पठाणकोट हल्ला आयएसआयनं घडवला आहे. पंजाब, जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे पुढे आलेय. 

Jan 2, 2016, 02:23 PM IST

हल्ल्याला भारत चोख प्रत्युत्तर देणार : राजनाथ सिंग

 कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याला भारताकडून सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, अशी प्रतिक्रिया हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली.

Jan 2, 2016, 01:37 PM IST

लश्कर-ए-तोएबाच्या हिट लिस्टवर मोदी, संसद, लष्कर मुख्यालय

मोठा धमाका करण्याचा प्लॅन लश्कर-ए-तोएबाने आखलाय. त्यानुसार मोदी, संसद आणि लष्कराचे मुख्यालय टार्गेट ठेवण्यात आलेय.

Dec 30, 2015, 03:44 PM IST

मुंबई हल्ल्याचा होणार उलगडा, जगासमोर येणार इत्यंभूत माहिती

26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड कोलमन हेडली माफीचा साक्षीदार झाल्याने पाकिस्तानचा खऱा चेहरा उघड होणार आहेत. या हल्ल्याचं षडयंत्र कोणी रचलं. त्यासाठी पैसा आणि शस्त्र कोणी पुरवली आणि तो कोणी घडवून आणला हे सगळं काही उघड होणार आहे. 

Dec 12, 2015, 04:44 PM IST

रशियन एअरबेसवर हल्ल्याची तयारी व्हिडिओ व्हायरल

सीरियात असद यांच्या विरोधकांनी एक व्हिडिओ जारी केलाय. लॅटकियात रशियन एअरबेसवर हल्ल्याची तयारी करतानाचा हा व्हिडिओ आहे. रशियानं केलेल्या बॉम्बहल्ल्याच्या प्रतिउत्तरादाखल या हल्ल्याची ही तयारी असल्याचं बोललं जातंय. 

Nov 28, 2015, 07:28 PM IST

पाहा दुर्मिळ Video : कसाबने कसा केला २६/११चा अतिरेकी हल्ला

पाकिस्तानचा अजमल कसाब याने मुंबईवर २६/११/२००८ ला अतिरेकी हल्ला केला. यामध्ये १६० लोकांचे निष्पाप बळी गेलेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसवर दहशतवाद्यांनी नंगानाच केला. त्यानंतर त्यांनी ताज हॉटेलमध्ये प्रवेश केला. याचा एक दुर्मिळ व्हिडिओ.

Nov 27, 2015, 05:00 PM IST

मालीच्या बामकोमध्ये हल्ला,१७० जणांना ठेवले ओलीस

 मालीच्या बामको येथील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये शस्त्रधारी अतिरेक्यांनी हल्ला केला असून तब्बल १७० लोकांना ओलीस ठेवल्याचे वृत्त आहे.

Nov 20, 2015, 03:45 PM IST

VIDEO : शांतीनं जगू देणार नाही, इसिसनं दिली धमकी

 इसिस सध्या जागतिक धोका बनत चालल्याचं दिसतंय. फ्रान्सवरील हल्ल्याची जबाबदारी इसिसनं घेतलीय. आतपर्यंत इसिसनं अकरा देशांवर आत्मघाती हल्ले केलेत.

Nov 14, 2015, 07:30 PM IST

VIDEO : पॅरीसच्या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा हाच तो पहिला व्हिडिओ

फ्रान्समध्ये शुक्रवारी रात्री राजधानी पॅरिस शहरामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. विविध सहा ठिकाणी झालेल्या या हल्ल्यात  १५८ जण ठार झाले तर जवळपास २०० जण जखमी झालेत. त्यातल्या ८०  जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व आठ दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. 

Nov 14, 2015, 05:31 PM IST