लश्कर-ए-तोएबाच्या हिट लिस्टवर मोदी, संसद, लष्कर मुख्यालय

मोठा धमाका करण्याचा प्लॅन लश्कर-ए-तोएबाने आखलाय. त्यानुसार मोदी, संसद आणि लष्कराचे मुख्यालय टार्गेट ठेवण्यात आलेय.

Updated: Dec 30, 2015, 04:13 PM IST
लश्कर-ए-तोएबाच्या हिट लिस्टवर मोदी, संसद, लष्कर मुख्यालय title=

नवी दिल्ली : २०१६च्या सुरुवातीला मोठा धमाका करण्याचा प्लॅन लश्कर-ए-तोएबाने आखला आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, संसद आणि लष्कराचे मुख्यालय टार्गेट ठेवण्यात आलेय.

देशात 'लश्कर-ए-तोएबा’ या दहशतवादी संघटनेकडून घातपात घडविण्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संसद भवन आणि लष्कराचे मुख्यालय दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. सीमेपलीकडून १५ ते २० दहशतवादी भारतात घुसण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली.

केंद्र सरकारने नववर्षानिमित्त करण्यात येणाऱ्या सेलिब्रेशनवेळी मुख्यत्वे पर्यटनस्थळांवर हल्ले होण्याची शक्यता वर्तविली होती. तसेच राज्यांना सतर्कतेच्या सूचना देखील दिल्या आहेत. महत्त्वाची ठिकाणे, धार्मिक स्थळे, बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे आदेश केंद्राने दिलेत.