इस्तंबूल बॉम्बस्फोटात १० ठार

तुर्कस्तानमधील गजबजलेल्या इस्तंबूल शहराच्या मध्यवर्ती भागात आज शक्तीशाली बॉम्बस्फोट घडवून आणला गेला. या स्फोटात १० नागरिक ठार झालेत.  

PTI | Updated: Jan 12, 2016, 04:18 PM IST
इस्तंबूल बॉम्बस्फोटात १० ठार  title=

इस्तंबूल : तुर्कस्तानमधील गजबजलेल्या इस्तंबूल शहराच्या मध्यवर्ती भागात आज शक्तीशाली बॉम्बस्फोट घडवून आणला गेला. या स्फोटात १० नागरिक ठार झालेत.  

हा स्फोट आत्मघातकी दहशतवाद्याने घडविलेला असावा, असा शंसय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडविल्याची शक्‍यता वर्तविण्यात आलेय.

या स्फोटामध्ये १५ जण जखमी झालेत. इस्तंबूलमधील जगप्रसिद्ध 'ब्ल्यू मॉस्क' ठिकाणापासून जवळच असलेल्या सल्तनत चौकामध्ये हा स्फोट घडविण्यात आला. या स्फोटानंतर नागरिकांमध्ये घबराट पसरलेय.