नवी दिल्ली : पठाणकोट हल्ला आयएसआयनं घडवला आहे. पंजाब, जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे पुढे आलेय. डिसेंबर २०१५मध्ये आयएसआयची बैठक झाली होती. आयएसआयनं अतिरेकी संघटनांना हाताशी धरुन हा हल्ला घडवलाय. आयएसआयनं जैश-अ-महमद, हिज्बुल अतिरेक्यांना पैसे दिल्याचे पुढे आलेय.
अधिक वाचा : हल्ल्याला भारत चोख प्रत्युत्तर देणार : राजनाथ सिंग
पंजाबमधील पठाणकोट येथील दहशतवाद्यांबरोबर लष्कराची चकमक आता संपली आहे. या हल्ल्यामध्ये 3 जवान शहिद झाले आणि सहा जवान जखमी झालेत. तर ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं.
जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
आणखी दोन दहशतवादी असल्याची शक्यता असल्यानं लष्करानं आपली शोध मोहिम सुरु ठेवली आहे. दरम्यान, पहाटे तीनच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. हे दहशतवादी लष्कराच्या वेशात आल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर पंजाबसह दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.
मोदींवर काँग्रेसची टीका
पठाणकोट एअरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आता राजकीय प्रतिक्रीयाही येऊ लागल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानशी चर्चा करताना या हल्ल्याचा जाब विचारावा अशी मागणी काँग्रेसनं केलीय. तर एकीकडे चर्चा आणि दुसरीकडे अतिरेकी हल्ला असं चालणार नाही अशी प्रतिक्रीया शिवसेनेनं दिली आहे.
जुलैमध्ये गुरुदासपूर जिल्ह्यातील दीनानगरमधअये दहशतवादी हल्ला झाला होता. दीड तासात सात हल्ले झाले होते. २० वर्षांनंतर पंजाबमध्ये एवढा मोठा हल्ला झाला होता. यात ११ तासांच्या एन्काउंटरनंतर दहशतवाद्यांना मारण्यात आलं होतं. आणि आता पठाणकोटमध्ये लगेचच पाच महिन्यांनंतर दुसरा हल्ला झालाय. यात चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय.