VIDEO : पॅरीसच्या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा हाच तो पहिला व्हिडिओ

फ्रान्समध्ये शुक्रवारी रात्री राजधानी पॅरिस शहरामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. विविध सहा ठिकाणी झालेल्या या हल्ल्यात  १५८ जण ठार झाले तर जवळपास २०० जण जखमी झालेत. त्यातल्या ८०  जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व आठ दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. 

Updated: Nov 14, 2015, 05:34 PM IST
VIDEO : पॅरीसच्या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा हाच तो पहिला व्हिडिओ title=

नवी दिल्ली : फ्रान्समध्ये शुक्रवारी रात्री राजधानी पॅरिस शहरामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. विविध सहा ठिकाणी झालेल्या या हल्ल्यात  १५८ जण ठार झाले तर जवळपास २०० जण जखमी झालेत. त्यातल्या ८०  जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व आठ दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. 

शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांनी फुटबॉल स्टेडीयम, रेस्टोरंट अशा पॅरिसमधल्या सार्वजनिक ठिकाणांना लक्ष्य केलं. यापैकी स्टेडियमबाहेर बॉम्बस्फोट होत असताना, आत फ्रान्स विरुद्ध जर्मनी हा फुटबॉल सामना सुरु होता. त्यावेळी फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद हे स्टेडिअममध्ये उपस्थित होते. 

विशेष म्हणजे या हल्ल्यानंतरही स्टेडियममध्ये जमलेले प्रेक्षक जराही गोंधळ होऊ न देता, राष्ट्रगीत म्हणत बाहेर पडले. हल्ल्यानंतर तात्काळ सुरक्षा यंत्रणांनी कारवाईला सुरुवात केली. एकूण आठ आत्मघातकी दहशतवाद्यांनी हा भ्याड दहशतवादी हल्ला केला. त्या आठ पैंकी सात दहशतवाद्यांनी नंतर बॉम्बनं स्वतःला उडवून दिलं. तर एक दहशतवादी सुरक्षायंत्रणांच्या चकमकीत मारला गेला. 

अधिक वाचा : पॅरिस अतिरेकी हल्ला : सोशल मीडियावर 'इसिस'चा जल्लोष

अधिक वाचा : फ्रान्समध्ये मोठा अतिरेकी हल्ला 

पॅरिस हल्ल्याची जबाबदारी इसिसनं स्विकारली आहे. दरम्यान एका संशयिताला तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलंय. आपण इसिसचे सदस्य असल्याचं त्यानं सांगितल्याची माहिती फ्रान्स पोलिसांनी दिलीय. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण फ्रान्समध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली. तर जागतिक स्तरावरुन या भ्याड हल्ल्यचा निषेध करण्यात आलाय. 

पहिल्या बॉम्बस्फोटाचा आवाज ऐकल्यानंतर स्टेडियममध्ये नागरिकांची आणि खेळाडूंची कशी धावपळ उडाली ते या व्हिडिओमधून दिसून येतंय... 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.