अजित पवार

अजित पवार यांना दे धक्का, बारामती बॅंकेचे संचालक पद रद्द

बारामती बॅंकेचे संचालक पद रद्द झाले आहे.  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार धक्का मानला जात आहे.

Feb 1, 2017, 05:36 PM IST

पुण्यात सन्मानपूर्वक आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न - अजित पवार

 पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीची बोलणी सुरु असून आज निर्णय व्हावा अशी अपेक्षा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. आघाडी व्हावी अशी आपली इच्छा असून ती सन्मानपूर्वक व्हावी यासाठी प्रयत्न असल्याचंही अजित पवार म्हणाले.

Jan 29, 2017, 04:31 PM IST

अजितदादांना नटसम्राट भेटतात तेंव्हा....!

 विश्वासू सहकारी आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या लढाईत ज्याच्या भरोशावर उतरायचे त्या सरसेनापती आझमभाईनी शत्रू पक्षाशी हातमिळवणी केल्यामुळे राजे अजितदादा उदास नजरेने राजवाड्यात बसले होते...आधी लक्ष्मण गेला नंतर महेश आणि आता आझम...! 

Jan 25, 2017, 06:57 PM IST

पुण्यात होणार आघाडी, अजित पवारांनी दिले संकेत

मुंबई महानगरपालिकेत युतीचं घोडं पुढे सरकत नसताना पुण्यात आघाडीचा निर्णय येत्या दोन दिवसात होईल असे स्पष्ट संकेत अजित पवारांनी दिलेत. 

Jan 24, 2017, 07:33 PM IST

राज ठाकरे घार पण ती कुठेपण फिरते... अजित पवार

पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवारांनी शिवसेना भाजपवर जोरदार टीका केली. 

Jan 23, 2017, 11:23 PM IST

भाजप गुंडांचा पक्ष - अजित पवार

भाजप गुंडांचा पक्ष - अजित पवार

Jan 17, 2017, 09:28 PM IST

पिंपरीत अजित पवारांनी भाजपवर केला हल्लाबोल

लोकसभा निवडणुकीत बऱ्या पैकी भाजप सेनेचे उमेदवार, पण तरीही भाजपने दुसऱ्या पक्षातल्या उमेदवारांना आयात करण्याचा धडाका सुरु केलाय, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पिंपरी चिंचवडमधील पत्रकार परिषदेत केली. 

Jan 17, 2017, 05:44 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठं आव्हान

मुंबई पुण्याप्रमाणे पिंपरी चिंचवड मनपा निवडणुकीकडे राज्याचं लक्ष असणार आहे. गेली 15 वर्षे शहरावर सत्ता असलेल्या अजित पवारांना मोठं आव्हान निर्माण झालंय.

Jan 11, 2017, 11:45 PM IST

पिंपरीत अजित पवार अडकले चक्रव्यूव्हात...!

घर फिरले की घराचे वासे ही फिरतात, याची पुरती जाणीव अजित पवार यांना झालीय...! पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे तगडे नेते आझम पानसरे यांनी भाजप मध्ये प्रवेश करत अजित पवारांना धक्का दिलाय...! त्यामुळं अजित पवार आता एकाकी पडलेत...! अजित पवारांची अवस्था भाजपच्या चक्रव्यूव्हात अडकलेल्या योध्या सारखी झालीय...!

Jan 9, 2017, 05:15 PM IST

पवारांविरोधातली अण्णांची याचिका हायकोर्टानं फेटाळली

सहकारी कारखान्यांमध्ये घोटाळा झाला असून यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचा समावेश असल्याचा आरोप अण्णा हजारेंनी केला होता.

Jan 6, 2017, 11:17 PM IST

मोदींच्या जाहिरातबाजीवर अजित पवारांची शेलकी टीका...

 पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी केलेल्या जाहिरातीचा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला. 

Jan 4, 2017, 07:23 PM IST

पुणे मेट्रोच्या स्थगितीवर अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

पुण्यातील मेट्रो प्रकल्पासाठीच्या सगळ्या परवानग्या मिळवल्याचा दावा मुख्यमंत्री करतात, तर मग आज एनजीटीनं मेट्रोच्या कामाला स्थगिती का दिली ? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केलाय. 

Jan 2, 2017, 06:42 PM IST