पुणे मेट्रोच्या स्थगितीवर अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

पुण्यातील मेट्रो प्रकल्पासाठीच्या सगळ्या परवानग्या मिळवल्याचा दावा मुख्यमंत्री करतात, तर मग आज एनजीटीनं मेट्रोच्या कामाला स्थगिती का दिली ? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केलाय. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 2, 2017, 06:42 PM IST
पुणे मेट्रोच्या स्थगितीवर अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल  title=

पुणे : पुण्यातील मेट्रो प्रकल्पासाठीच्या सगळ्या परवानग्या मिळवल्याचा दावा मुख्यमंत्री करतात, तर मग आज एनजीटीनं मेट्रोच्या कामाला स्थगिती का दिली ? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केलाय. 

मेट्रोच्या भूमिपूजनाच्या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भाषण करू न दिल्याबद्दल त्यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावरही टीका केलीय. 

कोंढव्यातील हज हाऊसचं भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते होणार होतं. मात्र या कामाला केंद्र सरकारची मंजुरी नसल्यानं भूमिपूजन न होता त्याठिकाणी अजित पवार यांची सभा झाली. यावेळी शहरातील विकासकामांवर दावा सांगताना तुम्ही पुण्याचे , आम्ही पुण्याचे , जनता पुण्याची मग पुण्याचा विकास काय नागपूर - मुंबईवाले करणार का असा टोलाही त्यांनी लगावला. याच विषयावरून सध्या मुंबई भाजप आणि शिवसेनेमध्ये जुंपलीये.