पिंपरीत अजित पवार अडकले चक्रव्यूव्हात...!

घर फिरले की घराचे वासे ही फिरतात, याची पुरती जाणीव अजित पवार यांना झालीय...! पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे तगडे नेते आझम पानसरे यांनी भाजप मध्ये प्रवेश करत अजित पवारांना धक्का दिलाय...! त्यामुळं अजित पवार आता एकाकी पडलेत...! अजित पवारांची अवस्था भाजपच्या चक्रव्यूव्हात अडकलेल्या योध्या सारखी झालीय...!

Updated: Jan 9, 2017, 05:15 PM IST
 पिंपरीत अजित पवार अडकले चक्रव्यूव्हात...! title=

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : घर फिरले की घराचे वासे ही फिरतात, याची पुरती जाणीव अजित पवार यांना झालीय...! पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे तगडे नेते आझम पानसरे यांनी भाजप मध्ये प्रवेश करत अजित पवारांना धक्का दिलाय...! त्यामुळं अजित पवार आता एकाकी पडलेत...! अजित पवारांची अवस्था भाजपच्या चक्रव्यूव्हात अडकलेल्या योध्या सारखी झालीय...!

पिंपरी चिंचवडमध्ये दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या ७ नगरसेवकांना पक्षात प्रवेश देत अजित पवारांनी सगळ्यांनाच गारद केलं ....पण त्याचा आनंद त्यांना घेता आला नाही...! भाजपने पलटवार करत राष्ट्रवादीचे तगडे नेते आझम पानसरे यांना पक्षात घेत अजित पवारांना धक्का दिलाय...! 

पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवारांना सत्तेची हॅट्रिक साधायची आहे, पण आता त्यांच्या कडे केवळ विलास लांडे हे एकमेव सहकारी राहिल्याने त्यांना लढाई सोपी राहिलेली नाही...आझम पानसरे यांच्या प्रवेशाने आता भाजपला पिंपरी विधानसभा मतदार संघात ही एक तगडा नेता मिळालाय... लक्ष्मण जगताप हे चिंचवड साठी, भोसरी साठी महेश लांडगे आणि आता पिंपरी साठी आझम पानसरे अशी नेत्यांची फौज भाजपकडं झालीय...त्यामुळं अजित पवार यांना त्यांच्याच एके काळाच्या सहकाऱ्यांनी घेरलंय...!

दुसरीकडं अजित पवारांनी मात्र आझम पानसरे यांच्या भाजप प्रवेशाला फारसं महत्व दिलेलं नाही...! पुण्यात त्यांना या बाबतीत छेडलं असता त्याचं उत्तर पिंपरी चिंचवडमध्ये देऊ असं सांगितलंय...!

आझम पानसरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपची ताकत नक्की वाढलीय. पण भाजपला अजून ही निवडणूक सोपी आहे असं नाही...! लक्ष्मण जगताप, महेश लांडगे आणि आझम पानसरे हे दादांचेच चेले आहेत. आणि गुरु कायम एक डाव राखून ठेवत असतो. त्यामुळं अजित पवार या तिघांच्या डावपेचांना पुरून उरण्याची ताकत ठेवतात. असं असलं तरी सध्या तरी अजित पवारांना भाजपने चक्रव्यूव्हात अडकलेल्या योध्यासारखी केलीय...!