World Cup 2023: कोणाचं नशीब कसं उजळेल हे काही सांगता येत नाही. नुकतंच याची प्रचिती चेन्नईतील एका फूड डिलीव्हरी बॉयला आली आहे. चेन्नईमध्ये फूड डिलीव्हरी बॉयचं काम करणारा एक तरूण आता थेट वर्ल्डकपच्या ( World Cup 2023 ) टीमशी जोडला जाणार आहे. ही कहाणी आहे 29 वर्षांच्या लोकेश कुमारची, ज्याचा प्रवास 48 तासांत फूड डिलिव्हरी बॉय पासून आंतरराष्ट्रीय टीमपर्यंत झाला आहे.
येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. यावेळी लोकेश कुमार ( Lokesh Kumar ) 2023 च्या वर्ल्डकपसाठी नेदरलँड्स टीममध्ये सामील झाला आहे. तो नेट गोलंदाज म्हणून टीमसोबत सराव करणार आहे. अलूरमध्ये सुरू होणाऱ्या प्री-वर्ल्ड कपमध्ये फिरकी गोलंदाजीचा सामना कसा करायचा हे नेदरलँड्सच्या फलंदाजांना शिकवणार आहे.
लोकेश ( Lokesh Kumar ) एक दिवसा आधी म्हणजे बुधवारीच नेदरलँड टीमच्या कॅम्पमध्ये सामील झालाय. लोकेशने ( Lokesh Kumar ) टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं की, “माझ्या कारकिर्दीतील हा सर्वात मौल्यवान क्षण आहे. मी अजून TNCA थर्ड डिव्हिजन लीगमध्येही खेळलेलो नाही. मी 4 वर्षे पाचव्या विभागात खेळलो आणि चालू हंगामासाठी इंडियन ऑइल (RO) S&RC या चौथ्या विभागातील संस्थेसाठी नोंदणी केली. नेदरलँड संघाने नेट बॉलर म्हणून निवड केल्यानंतर, मला असं वाटतंय की माझ्या अखेर कौश्यलेला मान्यता मिळाली.”
तो पुढे म्हणाला की, फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम केल्याने अप्रत्यक्षितरित्या का होईना त्याला क्रिकेटर म्हणून विकसित होण्यास मदत झाली. कॉलेजच्या दिवसानंतर माझे लक्ष क्रिकेटवर होतं. मी ४ वर्षे क्रिकेट खेळलो. मग 2018 मध्ये नोकरी करायचं ठरवलं. मी गेली चार वर्षे स्विगीसोबत आहे. माझ्याकडे उत्पन्नाचे दुसरं कोणतंही साधन नाहीये. हे काम असे आहे की, मला पाहिजे तेव्हा सुट्टी घेता येते.