'तो माझा शेवटचा सामना असेल आणि तेव्हाच माझं फेअरवेल होईल'

आयपीएलमधून निवृत्ती आणि चेन्नईसाठी शेवटचा सामना खेळल्याबद्दल त्याच्या मनातील गोष्ट सांगितली.

Updated: Oct 6, 2021, 10:02 AM IST
'तो माझा शेवटचा सामना असेल आणि तेव्हाच माझं फेअरवेल होईल' title=

दुबई : चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2021 मध्ये प्लेऑफमध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे. पण या दरम्यान कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एक आश्चर्यकारक विधान केले आहे. मंगळवारी महेंद्रसिंग धोनीने पहिल्यांदाच आयपीएलमधून निवृत्ती आणि चेन्नईसाठी शेवटचा सामना खेळल्याबद्दल त्याच्या मनातील गोष्ट सांगितली.

कर्णधार महेंद्रसिंग धोनी म्हणाला की, मला आशा आहे की, तो चेन्नईमध्येच त्याच्या फॅन्ससमोर CSKचा शेवटचा सामना खेळेल.

एमएस धोनीने मंगळवारी एका कार्यक्रमात याबाबत विधान केलं आहे. धोनी म्हणाला की, जर आपण फेअरवेलबद्दल बोललो, जेव्हा तुम्ही (चाहते) CSKसाठी मला पहायला येतील तेव्हाच माझं फेलअरवेल होईल. जेणेकरून तुम्हाला मला निरोप देण्याची संधी मिळेल. 

मला आशा आहे की मी चेन्नईला येऊन माझा शेवटचा सामना खेळू शकेन जेणेकरून माझे चाहते तिथे उपस्थित असतील, असंही पुढे धोनी म्हणाला आहे.

महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तेव्हापासून तो फक्त आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज या टीम कडून खेळत आहे. गेल्या वर्षी जेव्हा चेन्नईच्या टीमची आयपीएलमधील कामगिरी काही खास चांगली राहिली नव्हती. तेव्हाही धोनी आयपीएलमधून बाहेर निवृत्ती घेईल अशा चर्चा होत्या. पण नंतर त्याने त्या गोष्टीला स्पष्टपणे नकार दिला.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x