दुबई : आयपीएलची स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. काल राजस्थान रॉयल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स असा सामना रंगला होता. या सामन्यात अगदी सहजरित्या मुंबईने राजस्थानवर 8 विकेट्सने मात केली. या विजयामुळे मुंबई इंडियन्सने त्यांच्या प्लेऑफमधील आशा अजून जिवंत ठेवल्या आहेत.
आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 13 पैकी 6 सामने जिंकले आहेत. 12 पॉईंट्सह त्यांनी 5 व्या क्रमांकावर झेप घेतली आहेत. रोहितची आर्मी पॉइंट्स अजूनही कोलकाता नाईट रायडर्सच्या बरोबर आहेत. पण ते रन रेटच्या बाबतीत अजूनही मागे आहेत.
मुंबई इंडियन्सने त्यांच्या शेवटच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला मोठ्या फरकाने पराभूत केलं आणि राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सला त्यांच्या पुढील सामन्यात पराभूत केलं तरच ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात. मुंबईला कोणत्याही परिस्थितीत त्यांचा रन रेट सुधारावा लागणार आहे.
जर मुंबई इंडियन्स सनरायझर्स हैदराबादकडून हरली आणि राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला, तर 3 संघांचे 12 गुण असतील आणि केकेआरचे चांगले रन रेट असतील. त्यामुळे तो संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकेल.
कालच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) राजस्थान रॉयल्सवर (Rajasthan Royals) 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. राजस्थानने मुंबईला विजयासाठी 91 धावांचे आव्हान दिलं होतं. हे विजयी आव्हान मुंबईने 2 विकेट्सच्या मोबदल्यात 8.2 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. मुंबईने 70 चेंडू राखून ठेवत हा सामना जिंकला. पलटणने मोठ्या फरकाने सामना जिंकल्याने प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशा या कायम आहेत.