जगाचा भूगोल बदलणार? जगात 7 नाही तर फक्त सहाच खंड असल्याचा संशोधकांचा खळबळजनक दावा

जगाचा भूगोल बदलणार आहे. संशोधकांनी एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. जगात सात नाही तर फक्त सहाच खंड आहेत असा हा दावा  आहे. संशोधकांच्या या नव्या दाव्याने जुन्या  सिद्धांताला आव्हान दिले आहे. शाळेत आपण जगात सात खंड असल्याचे शिकलो आहे. संशोधकांनी केलेला हा नवा दावा नेमका काय आहे जाणून घेऊया. 

वनिता कांबळे | Updated: Jan 28, 2025, 08:22 PM IST
  जगाचा भूगोल बदलणार? जगात 7 नाही तर फक्त सहाच खंड असल्याचा संशोधकांचा खळबळजनक दावा title=

7 Continents In The World : जगाचा भूगोल बदलणार आहे. संशोधकांनी एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. जगात सात नाही तर फक्त सहाच खंड आहेत असा हा दावा  आहे. संशोधकांच्या या नव्या दाव्याने जुन्या  सिद्धांताला आव्हान दिले आहे. शाळेत आपण जगात सात खंड असल्याचे शिकलो आहे. संशोधकांनी केलेला हा नवा दावा नेमका काय आहे जाणून घेऊया. 

आपल्या पृथ्वीवर एकूण सात खंड आहेत.  आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि आर्क्टिक अशी या सात खंडांची नावे आहेत.  पृथ्वीचे सुमारे 30 % क्षेत्र हे या सात खंडांनी व्यापले आहे. आता मात्र, जगात 7 नाही तर फक्त सहाच खंड असल्याचा दावा करण्यात आला आहे.   Earth.com मध्ये एक अहवाल प्रकाशित झाला आहे. या अहवालात डॉ. जॉर्डन फाथियन यांच्या नेतृत्वाखालील डर्बी विद्यापीठातील संशोधकांच्या पथकाने पृथ्वीवर फक्त सहा खंड असल्याचा दावा केला आहे. हा नवा दावा जगाचा भूगोल बदलणारा आहे. 

हे देखील वाचा.... 70 कोटी सूर्यांपेक्षा मोठ्या BlackHoleचा निशाणा पृथ्वीवर! जगभरातील संशोधकांना मोठा धक्का

डॉ. फॅथेन यांच्या मते युरोपियन आणि उत्तर अमेरिकन खंडांचे विखंडन पूर्ण झालेले असा दावा करण्यात आला आहे.  उत्तर अमेरिकन आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्स अद्याप विभक्त झालेले नाहीत. यामुळे जगात 7 नाही तर फक्त सहाच खंड असल्याचा दावा डर्बी विद्यापीठातील संशोधकांच्या पथकाने केला आहे. प्लेट टेक्टोनिक्स सिद्धांताच्या मदतीने त्यांनी हा दावा केला आहे. 

नवीन संशोधन हे ग्रीनलँड समुद्र आणि उत्तर अटलांटिक महासागर यांच्यामध्ये वसलेल्या आइसलँडच्या अभ्यासावर आधारित आहे.  60 दशलक्ष वर्षांपूर्वी मध्य-अटलांटिक रिजमधील घर्षणाने  आईसलँडची निर्मिती झाली असे मानले जाते.  नविन संशोधनात या सिद्धांताला आव्हान देण्यात आले आहे.  आइसलँड आणि ग्रीनलँड देखील आइसलँड फॅरो रिजमध्ये युरोपियन आणि उत्तर अमेरिकन खंडांचे तुकडे आहेत.