बाजरीच्या भाकरीसोबत 'हे' पदार्थ खाल्ल्याने मिळतील अनेक फायदे; बऱ्याच आजारांपासून मिळेल सुटका

हिवाळ्यात कित्येक लोक हे बाजरीच्या भाकरीचे सेवन करतात. बाजरीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. असे काही पदार्थ आहेत जे बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ल्याने, त्याचा आपल्या शरीराला दुप्पट फायदा होईल. बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ले जाणारे असे कोणते पदार्थ आहेत? पाहूया.

Updated: Jan 18, 2025, 04:15 PM IST
बाजरीच्या भाकरीसोबत 'हे' पदार्थ खाल्ल्याने मिळतील अनेक फायदे; बऱ्याच आजारांपासून मिळेल सुटका title=

Bajra Benefits: हिवाळ्यात लोक ज्या पदार्थांपासून शरीराला उष्णता मिळते, असे पदार्थ खाणे पसंत करतात. या ऋतूत आपल्या आहारात शरीराला उष्णता देणाऱ्या पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. अशा पदार्थांमुळे आजार सुद्धा दूर होण्यास मदत होते. शरीरातील इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी उष्णदायी पदार्थ अत्यंत फायदेशीर ठरतात. बाजरी हा अशाच हिवाळ्यातील शरीरासाठी लाभदायक पदार्थांपैकी एक आहे. हिवाळ्यात कित्येक लोक हे बाजरीच्या भाकरीचे सेवन करतात. बाजरीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. खास करुन हिवाळ्यात बाजरीच्या भाकरीचे सेवन आरोग्यदायी मानले जाते. 

परंतु, असे काही पदार्थ आहेत जे बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ल्याने, त्याचा आपल्या शरीराला दुप्पट फायदा होईल. बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ले जाणारे असे कोणते पदार्थ आहेत? पाहूया. 

बाजरीला हिवाळ्यातील सुपरफूड मानले जाते. बाजरीमध्ये असणारे पोषक तत्त्व हे शरीरातील पोषक तत्त्वांच्या कमतरतेला भरुन काढतात. बाजरीच्या भाकरीचे सेवन केल्याने थंडीपासूनसुद्धा आराम मिळण्यास मदत होते. बाजरी शरीरात उष्णता निर्माण करते. 

बाजरीचे सेवन कोणत्या पदार्थांसोबत करावे?

पचनसंस्थेत बाधा आणणाऱ्या मैदा आणि तेलकट पदार्थांचे सेवन करणे शरीरासाठी घातक ठरु शकते. परंतु, हिवाळ्यात भरपूर प्रमाणात फायबर असलेल्या भाज्यांसोबत बाजरीचे सेवन केले पाहिजे. बाजरीसोबत फायबरचे अधिक प्रमाण असलेल्या भाज्या पचनासाठी फायदेशीर मानल्या जातात. 

बाजरीची लापशी

बाजरीच्या भाकरीशिवाय तुम्ही बाजरीच्या लापशीचेसुद्धा सेवन करु शकता.  तुम्ही मोठ्या प्रमाणात फायबर असलेल्या भाज्या बाजरीच्या लापशीमध्ये घालू शकता. फायबरयुक्त भाज्यांचे सेवन बाजरीच्या लापशीसोबत खाल्ल्याने चव तर वाढेलच पण त्यासोबत आरोग्यासाठी सुद्धा बरेच फायदे मिळतील. 

बाजरीच्या सेवनानंतर काय करावे?

बाजरीचे सेवन केल्यानंतर जवळपास अर्ध्या तासानंतर भरपूर पाणी प्या. बाजरीच्या सेवनानंतर भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्याने पचनप्रक्रिया अधिक सुरळीत होण्यास मदत होते. 

बाजरीसोबत 'या' पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे

बरेचजण तूपासोबत बाजरीचे सेवन करणे पसंत करतात. परंतु, हे शरीरासाठी घातक ठरु शकतं. बरेचदा लोक बाजरीची भाकरी ही भरपूर प्रमाणात तूप लावून तसेच चटणीसोबत खातात. अशा प्रकारे सेवन करणे हे शरीरासाठी धोकादायक ठरु शकते. खरंतर, बाजरी हे एक जड अन्न आहे, म्हणून त्यात जास्त प्रमाणात तूप टाकून ते खाल्ल्याने पचायला थोडे कठीण जाते.

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)