TVS Jupiter : CNG आणि पेट्रोल दोन्ही मोडवर धावणारी जगातील पहिली CNG स्कूटर, 226 Km चा जबरदस्त मायलेज

 भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो मध्ये जगातील पहिल्या CNG स्कूटरची झलक पहायला मिळली आहे. Jupiter कंपनीने TVS Jupiter 125 CNG ही स्कूटर सादर केली आहे.   

वनिता कांबळे | Updated: Jan 18, 2025, 04:29 PM IST
  TVS Jupiter : CNG आणि पेट्रोल दोन्ही मोडवर धावणारी जगातील पहिली CNG स्कूटर, 226 Km चा जबरदस्त मायलेज title=

TVS Jupiter CNG : लवकरच आता CNG कार प्रमाणे CNG स्कूटरने फिरता येणार आहे. देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक TVS मोटर्सने  जगातील पहिली CNG स्कूटर निर्माण केली आहे. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो (BMGE 2025) मध्ये जगातील जगातील या  पहिल्या CNG स्कूटरची झलक पहायला मिळाली.   सीएनजी आणि पेट्रोल मोडमध्ये ही स्कूटर 226 Km चा जबरदस्त मायलेज देईल असा दावा कंपनीने केला आहे. 

TVS Jupiter CNG स्कूटरचा लुक आणि डिझाईन पारंपारिक ज्युपिटर प्रमाणे आहे. पण या स्कूटरची सिस्टम तसेच पॉवरट्रेनमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. याशिवाय स्कूटरच्या पॅनलवर सीएनजी बॅजिंगही देण्यात आले आहे.  एक्स्पो मध्ये सादर करण्यात आलेले  मॉडेल हे कॉन्सेप्ट  मॉडेल असल्याने, कंपनीने त्याच्या बॉडी पॅनल्सवर कोणतेही मोठे काम केलेले नाही.

या स्कूटरच्या इंजिन मेकॅनिझम देखील लेटेस्ट आहे. कंपनीने शोकेस केलेल्या कॉन्सेप्ट मॉडेलमध्ये 124.8-cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड द्वि-इंधन इंजिन वापरण्यात आले आहे.  इंजिन 7.2  हॉर्स पावर आणि 9.4 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन कंटिन्युअसली व्हेरिएबल ट्रान्समिशन (CVT) ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. त्याचा कमाल वेग ताशी 80.5 किमी इतका आहे.

ज्युपिटर सीएनजीचे डिजाईन पाहिले असता याचा  सीएनजी सिलिंडर कुठे बसवला आहे असा प्रश्न पडतो. या स्कूटरच्या सीटखाली सीएनजी सिलिंडर बसवण्यात आला आहे. TVS ज्युपिटर 125 द्वि-इंधनामध्ये पेट्रोलसाठी 2 लिटरची टाकी आहे आणि CNG साठी 1.4 किलोचा सिलेंडर देण्यात आला आहे.  बजाजने अलीकडेच लाँच केलेल्या जगातील पहिल्या बजाज फ्रीडम या सीएनजी बाईकच्या रचनेशी जुळती आहे.सीटच्या खाली CNG नोजल दिलेले आहे. 

सीएनजी आणि पेट्रोल मोडमध्ये ही स्कूटर 226 किलोमीटरपर्यंत एकत्रित ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम असेल असा दावा कंपनीने केला आहे. CNG वरून पेट्रोल मोडवर स्विच करण्यासाठी, एक साधे बटण देण्यात आले आहे. फक्त एक बटन दाबून अगदी सहज फ्यूएल मोड चेंज करता येतो. 

ज्युपिटर 125 सीएनजीमध्ये एलईडी हेडलाइट, मोबाइल चार्जिंग पोर्ट, ऑल-इन-वन लॉक आणि साइड स्टँड इंडिकेटर असे जबरदस्त फिचर्स देण्यात आले आहेत.  ज्युपिटर 125 सीएनजीला मेटल-मॅक्स बॉडी देण्यात आली आहे.  ज्युपिटर 125 सीएनजी स्कूटर कधी लाँच होईल याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.