Ankita Lokhande : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये अंकिता लोखंडेचं देखील नाव येतं. अंकिता लोखंडे सध्या 'लाफ्टर शेफ्स' सेलिब्रेटी या शोमध्ये दिसणार आहे. या शोची सगळे आतुरतेनं प्रतीक्षा करत असताना सगळे त्यात कोणते सेलिब्रिटी पाहायला मिळणार यासाठी उत्सुक आहेत. इतकंच नाही तर या शोचे काही प्रोमो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असं असलं तरी या शोचे सगळे एपिसोड हे शूट झाले आहेत. त्याचे प्रोमो निर्माते हळू हळू शेअर करत आहेत. नुकताच एक प्रोमो प्रदर्शित झाला असून अंकिता लोखंडेची सासू आणि आई दिसत आहेत. त्यात विकीची आई नातवंडाची अपेक्षा असल्याचं जाहिर करते.
'लाफ्टर शेफ्स' च्या नव्या प्रोमोमध्ये अंकिता लोखंडेची सासू, भारतीला बोलते की हिऱ्यासारखा मुलगा आणि सोन्यासारखी सूनेला शोमध्ये सोडायला आलीये. मग अंकिताची आई म्हणते त्यांच्यात इतकं प्रेम आहे हे देखील त्यातचं पाहिलं आहे. मग तिची सासू म्हणाली, मात्र, प्रेमाचा प्रसाद अजून दिलेला नाही, हे काय केलं त्यांनी. हे ऐकताच विकी जैनला धक्का बसतो आणि अंकिता लाजते.
त्यानंतर भारती ही प्रेग्नंसीकडे इशारा करते आणि विकी जैनला विचारते की 'तुला कोणी निराश केलं मला ते सांग, भावा तू करु शकतोस.' अंकिता पुढे तिचा पधर पुढे करत म्हणाली, 'मी कधीपासून अशी बसलीये बेबी.' विकी बोलतो, 'असं झोळीत ठेवलं जातं नाही. हिला समजवा रोणी. त्यामुळे होत नाही आहे.' हे ऐकून सगळेच हसू लागतात.
हेही वाचा : 'मेरे हस्बॅन्ड की बीवी' चित्रपटाच्या सेटवर छत ढासळलं; अर्जुन कपूर आणि जॅकी भगनानीसह 6 लोकांना दुखापत
या व्हिडीओला पाहिल्यानंतर चाहचे त्यांच्या आवडत्या स्पर्धकाविषयी प्रश्न विचारू लागतात. एकानं म्हटलं की, 'अरे या दोघांना आणलं तर, अली, अर्जुन, करण आणि निया यांना पण घेऊन या.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'करण, अली आणि नियाला देखील घेऊन या.' या शोचा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता या शोमध्ये काय काय पाहायला मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.