T20 Cricket : येत्या 2 जूनपासून वेस्टइंडिज आणि अमेरिकेत टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup 2024) सुरुवात होतेय. यंदाच्या स्पर्धेत तब्बल 20 संघांनी भाग घेतला आहे. सध्याच्या क्रिकेट जगतात टी20 हा क्रिकेट चाहत्यांचा सर्वात आवडीचा फॉर्मेट बनला आहे. टी20 क्रिकेट म्हणजे चौकार-षटकारांची आतषबाजी, धावांची बरसता. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत तर धावांचा डोंगर उभारला जातोय. तब्बल चार वेळा 250 हून अधिक धावांचा स्कोर उभा केला गेलाय. पण एका आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात अशी गोष्ट घडली जे पाहून क्रिकेट चाहत्यांना आश्चर्यांचा धक्का बसला.
टी20 क्रिकेटमध्ये भूकंप
एका आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात तब्बल सहा फलंदाज भोपळाही न फोडता पॅव्हेलिअनमध्ये परतले. तर या संघाच्या फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या होती 4. यावरुन या संघाची एकूण धावसंख्या किती असेल याचा अंदाज क्रिकेट चाहते लावू शकतात.
6 फलंदाज 0 वर बाद
हा प्रकार घडलाय जपान आणि मंगोलियादरम्यानच्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात (Japan vs Mongolia 2nd T20I). मंगोलियाचा क्रिकेट संघ जपानच्या दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघात 7 टी20 सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात मंगोलियाचे सहा फलंदाज खेळपट्टीवर केवळ हजेरी लावायला आले होते. तर इतर चार फलंदाजांनी प्रत्येकी 2, 1, 4 आणि 2 धावा केल्या. अकरावा फलंदाज खातं न खोलताच नाबाद राहिला. मंगोलियाचा संपूर्ण संघ केवळ 12 धावांवर गारद झाला. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही दुसरी सर्वोत कमी धावसंख्या आहे.
205 धावांनी पराभव
मंगोलियाविरुद्ध पहिली फलंदाजी करणाऱ्या यजमान जपान क्रिकेट संघाने निर्धारित 20 षटकात 7 विकेट गमावात 217 धावा केल्या. जपानचा प्रमुख फलंदाजाने सर्वाधिक 69 धावा केल्या. विजयाचं आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या मंगोलियाचा संघ अवघ्या 8.2 षटकातच बाद झाला. जपानने हा सामना 68 चेंडू आणि 205 धावांनी जिंकला. जपानच्या एका गोलंदाजाने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या.
टी20 क्रिकेटमधली दुसरी सर्वात कमी धावसंख्या
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. याआधी 2023 मध्ये ऑईल ऑफ मेन्सचा संघ 10 धावांवर गारद झाला होता. हे आव्हान स्पेनच्या संघाने अवघ्या 2 चेंडूत पूर्ण केलं होतं. त्यानंतर आता मंगोलिच्या संघाची नोंद झाली आहे. मंगोलियाचा संघ 12 धावांवर ऑलआऊट झाला. 2019 मध्ये टर्की आणि चेक रिपब्लिकमध्ये क्रिकेट सामना झाला होता. या सामन्यात टर्कीचा संघ 21 धावांवर बाद झाला. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला हा तिसरा सर्वात कमी स्कोर आहे.