T 20 World Cup साठी टीम इंडियामध्ये बदल, 'या' मुंबईकर खेळाडूला संधी

टी 20 वर्ल्ड कप (t 20 World Cup 2021) सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाच्या (Team India) 15 खेळाडूंच्या संघात 1 बदल केला आहे.

Updated: Oct 13, 2021, 05:38 PM IST
 T 20 World Cup साठी टीम इंडियामध्ये बदल, 'या' मुंबईकर खेळाडूला संधी   title=

यूएई : टी 20 वर्ल्ड कपची (T 20 World Cup) सुरुवात येत्या 18 ऑक्टोबरपासून होणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. बीसीसाआयने 15 सदस्यीय संघात एक बदल केला आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली आहे. (t 20 World Cup 2021 Shardul Thakur replaces Akshar Patel in 15 member squad for Team India) 

बीसीसीआयने (BCCI) यामध्ये फिरकीरपटू अक्षर पटेलच्या (Axar Patel) जागी राखीव खेळाडूंच्या यादीत असलेल्या शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) संधी दिली आहे.त्यामुळे आता अक्षर पटेल हा राखीव खेळाडू म्हणून उपलब्ध असणार आहे. 

निवड समितीची टीम मॅनेजमेंटसोबत चर्चा झाली. त्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.  दरम्यान शार्दुलचा 15 सदस्यीय संघात समावेश केल्याने, तो प्लेइंग इलेव्हनच्या निवडीसाठी उपलब्ध असणार आहे. 

वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या मॅचेस

पाकिस्तान (24 ऑक्टोबर)

न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)

अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)

ग्रुप स्टेजमधील क्वालिफाय टीम 1 (5 नोव्हेंबर)

ग्रुप स्टेजमधील क्वालिफाय टीम 2 (8 नोव्हेंबर)  

टी 20 वर्ल्ड कपसाठी सुधारित टीम इंडिया :  विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी. 
 
राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि अक्षर पटेल.