'या' स्टार ऑलराऊंडर खेळाडूला T 20 World Cup मध्ये संधी नाहीच!

टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला (T 20 World Cup 2021) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे.    

Updated: Oct 13, 2021, 04:56 PM IST
 'या' स्टार ऑलराऊंडर खेळाडूला T 20 World Cup मध्ये संधी नाहीच! title=

मुंबई : टी 20 वर्ल्ड कप (T 20 World Cup) स्पर्धा जस जशी जवळ येतेय, तस तशी क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचतेय. या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 18 ऑक्टोबरपबासून सुरुवात होतेय. या स्पर्धेचं आयोजन हे यूएई आणि ओमानमध्ये करण्यात आले आहे. या टी 20 वर्ल्ड कपसाठी सहभागी देशांनी आपल्या संघाची घोषणा केली आहे. (t 20 world cup west indies captain kieron pollard say sunil narine is not part of their squad)

मात्र त्यानंतरही प्रत्येत टीम आपल्या खेळाडूंमध्ये बदल करु शकते. या दरम्यान वेस्टइंडिजने गत टी 20 वर्ल्ड कपमधील मॅच विनर खेळाडूला या स्पर्धेत संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

किरोन पोलार्ड (Kieron Pollard) या टी 20 वर्ल्ड कपमध्ये विंडिजचे नेतृत्व करणार आहे. पोलार्डने सुनील नारायणला (Sunil Narine)  या टी 20 वर्ल्ड कपमधील स्थानाबाबत प्रतिक्रिया दिली.

"सुनीलने आयपीएलमध्ये कोलतकाताकडून या मोसमात धमाकेदार कामगिरी केली. मात्र त्यानंतरही सुनीलला विडिंजमध्ये टी 20 वर्ल्ड कपसाठी संधी मिळणार नाही", असं पोलार्ड म्हणाला. पोलार्ड क्रिकइंफोसोबत बोलत होता. यावेळे त्याने सुनीलबाबत प्रतिक्रिया दिली. 

सुनीलने एलिमिनेटरच्या सामन्यात बंगळुरु विरुद्ध अष्टपैलू कामगिरी केली. यामध्ये त्याने आधी बॉलिंग करताना 4 विकेट्स घेतल्या. तर बॅटिंग करताना त्याने 26 धावांची निर्णायक क्षणी महत्त्वाची खेळी केली. 

सुनीलने या मोसमातील 8 सामन्यांमध्ये 11 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला सुनीलने 2019 पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे सुनीलला संघात संधी मिळाली नाही. शुक्रवारपर्यंत टीममध्ये बदल करता येणार आहे.

विराटचा शत्रू टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर 

सुनीलने एलिमिनेटर सामन्यात बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली, एबी डीव्हीलियर्स, ग्लेन मॅक्सवेल आणि केएस भरत या फलंदाजांना बाद केलं होतं. तर यानंतर बॅटिंग करताना त्याने एकाच ओव्हरमध्ये 3 कचकचीत सिक्स खेचत सामना कोलकाताच्या बाजूने फिरवला होता. 

विराटचा कर्णधार म्हणून हा शेवटचा हंगाम होता. मात्र या सुनीलच्या या अष्टपैलू खेळीने विराटचं विजेतेपद जिंकून देण्याचं स्वप्न भंग झालं. त्यामुळे सुनील हा विराटचा शत्रू झाला.

"विडिंजमध्ये बदल होणार नाही"

मी सुनीलला टीममध्ये समाविष्ट करण्याचं कारण सांगितलं, तर ते कारण सोयीने तसेच तोडून सांगितंल जाईल. त्यामुळे या मुद्द्यापेक्षा 15 खेळाडूंवर ध्यान देणं योग्य ठरेल. हे आमच्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे", असं पोलार्डने नमूद केलं.   

"सुनीलला संधी का दिली नाही, याबाबत मी अधिक बोलणार नाही. यावर अनेकदा खूप काही म्हंटलं गेलंय. मला वाटतं सुनीलला टीममध्ये स्थान न दिल्याचं कारण तेव्हाच सांगितलं गेलंय. वैयक्तिक पातळीवर सुनील हा क्रिकेटर नंतर आधी माझा मित्र आहे. आम्ही सोबत खेळता खेळता मोठे झालो आहोत. सुनील जागतिक स्तरावरचा क्रिकेटर आहे", असंही पोलार्डने ठासून सांगितलं.