सय्यद मुश्ताक अली टी-२०: पहिल्याच मॅचमध्ये मुंबईचा पराभव

सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेची सुरुवात झाली आहे. एससीए स्टेडिअममध्ये झालेल्या पहिल्याच मॅचमध्ये मुंबईच्या टीमला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 7, 2018, 08:53 PM IST
सय्यद मुश्ताक अली टी-२०: पहिल्याच मॅचमध्ये मुंबईचा पराभव title=
Representative Image

राजकोट : सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेची सुरुवात झाली आहे. एससीए स्टेडिअममध्ये झालेल्या पहिल्याच मॅचमध्ये मुंबईच्या टीमला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या स्पर्धेच्या पहिल्या मॅचमध्ये बडोद्याच्या टीमने मुंबईचा १३ रन्सने पराभव केला आहे.

बडोद्याचा विकेटकीपर आणि ओपनर बॅट्समन उरविल पटेल याने २९ बॉल्समध्ये ५० रन्स केले आणि कॅप्टन दिपक हुड्डा याने ३९ बॉल्समध्ये ६६ रन्सची इनिंग खेळली. यामध्ये ८ फोर आणि एका सिक्सरचा समावेश आहे. तर, कृणाल पांड्याने २६ बॉल्समध्ये ४४ रन्स केले.

हुड्डा आणि पटेल यांनी केलेल्या या जबरदस्त इनिंगमुळे बडोद्याच्या टीमने तीन विकेट्स गमावत मुंबईसमोर २१० रन्सचा डोंगर उभा केला. 

मुंबईच्या टीममधील धवल कुलकर्णी वगळता इतर सर्वच बॉलर्सची चांगलीच धुलाई झाली. शार्दुल ठाकुरने आपल्या चार ओव्हर्समध्ये ४७ रन्स दिले.

बडोद्याच्या टीमने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या टीमने आठ विकेट्स गमावत १९७ रन्सपर्यंतच मजल मारता आली. यामध्ये सिद्धेश लाडने ५१ बॉल्समध्ये ८२ रन्सची इनिंग खेळली.