स्मिथ ब्रॅडमॅनच्या या रेकॉर्ड जवळ, ६९ वर्ष जुना रेकॉर्ड तोडणार?

टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा आयसीसी टेस्ट खेळाडूंच्या रॅकिंगमध्ये एक पायरी वर चढत तिस-या स्थानावर येऊन पोहचला आहे.

Updated: Dec 19, 2017, 05:08 PM IST
स्मिथ ब्रॅडमॅनच्या या रेकॉर्ड जवळ, ६९ वर्ष जुना रेकॉर्ड तोडणार? title=

दुबई : टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा आयसीसी टेस्ट खेळाडूंच्या रॅकिंगमध्ये एक पायरी वर चढत तिस-या स्थानावर येऊन पोहचला आहे.

पुजारा टेस्ट फलंदाजांच्या रॅंकिंगमध्ये ८७३ अंकाने तिस-या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ दोन वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने इंग्लंड विरूद्ध पर्थमध्ये तिस-या एशेज टेस्टमध्ये दुहेरी शतक झळकावलं आणि आता तो सर्वाधिक रॅंकिंग अंकाने डॉन ब्रॅडमनच्या रेकॉर्डच्या जवळच पोहोचला आहे.  

काय आहे रेकॉर्ड?

तिस-या एशेज टेस्टमध्ये २३९ रन करणा-या स्मिथचे ९४५ अंक आहे आणि तो लेन हटनसोबत या यादीत दुस-या स्थानावर आहे. ब्रॅडमनचे ९६१ अंक आहेत, या अंकांपासून स्मिथ १६ अंकाने मागे आहे. पहिल्या क्रमांकावर राहत सर्वाधिक टेस्ट खेळण्याच्या बाबतीत स्मिथ ब्रॅडमनच्या पुढे आहे. तो ११४ टेस्टमध्ये पहिल्या क्रमांकाच्या रॅंकिंगवर आहे. त्याच्या पुढे गॅरी सोबर्स(१८९), विव रिचर्डस(१७९), ब्रायन लारा(१४०) आणि सचिन तेंडुलकर (१३९) आहे. 

गोलंदाजीमध्ये कोण आहे पुढे?

गोलंदाजांच्या यादीत रविंद्र जडेजा आणि आर. अश्विन तिस-या आणि चौथ्या स्थानावर आहे. तर इंग्लंडचा जेम्स अ‍ॅंडरसन आणि ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवुड एक पायरी वर चढत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. 

पर्थ टेस्ट नंतर कोण कुठे?

पर्थ टेस्टनंतर इंग्लंडचा डेविड मालान ४७ पाय-या चढून करिअरच्या सर्वश्रेष्ठ ५२व्या रॅंकिंगवर पोहोचला आहे. तर मिशेल मार्श ने ४४ क्रमांकाची झेप घेत ६५व्या स्थानावर पोहोचला आहे. जानी बेअरस्टा एक क्रमांकाने पुढे येत १५ व्या स्थानावर आणि उस्मन ख्वाजा दोन पाय-या वर चढत १९व्या स्थानावर आहे.