विराट- अनुष्काला लग्नाचं 'हे' कमाल गिफ्ट देणार शेजारी

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला इटलीमध्ये विवाहबद्ध झाले.

Updated: Dec 19, 2017, 04:28 PM IST
विराट- अनुष्काला लग्नाचं 'हे' कमाल गिफ्ट देणार शेजारी  title=

मुंबई : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला इटलीमध्ये विवाहबद्ध झाले.

मीडिया आणि चाहत्यांपासून दूर जाऊन गुप्तपणे विवाहबद्ध झाल्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून याची घोषणा केली. 

भारतामध्ये ग्रॅन्ड सेलिब्रेशन 

विरूष्का इटलीमध्ये लग्नाला, त्यानंतर हनीमूनला गेल्यानंतर लवकरच भारतामध्ये परतणार आहेत. येत्या २१ डिसेंबर दिल्लीत आणि त्यानंतर २६ डिसेंबरला मुंबईत रिसेप्शन होणार आहे.  

शेजार्‍यांचं खास गिफ्ट 

विरूष्का लग्नानंतर मुंबईत वरळी भागात रहायला येणार असल्याची शक्यता आहे. पण विराटच्या दिल्लीतील पश्चिम विहारमधील मीराबाग भागात ब्लॉक-ए स्थित 43 या घराच्या शेजारार्‍यांची त्यांना गिफ्ट देण्याचा प्लान केला आहे.  

दिल्लीतील या घरामध्ये सध्या कोणीही राहत नाही. शेजार्‍यांनी या अपार्टमेंटला 'विराट विहार' नाव ठेवण्याचा प्लान  केला आहे.  

लग्नानंतर दिल्ली आणि मुंबईत रिसेप्शन झाल्यानंतर विराटसोबत अनुष्कादेखील भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौर्‍यामध्ये सामिल होणार आहेत.