जेवणाचं बिल पाहून BCCI चे डोळे विस्फारले, टीम इंडियाच्या खेळाडूंचा कारनामा

बापरे! टीम इंडियाच्या खेळाडूंचा BCCI ला दणका, बिल पाहून अधिकाऱ्यांनाही फुटला घाम

Updated: Jun 12, 2022, 09:40 AM IST
जेवणाचं बिल पाहून BCCI चे डोळे विस्फारले, टीम इंडियाच्या खेळाडूंचा कारनामा title=

मुंबई : BCCI सर्वात श्रीमंत आणि सर्वात धनवान क्रिकेट असोसिएशन आहे. भारतीय क्रिकेट टीम जेवढी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे तेवढीच वेगवेगळ्या विवादांसाठी देखील ओळखली जाते. भारतात घरच्या मैदानावर रणजी ट्रॉफीसाठी टुर्नामेंट सुरू आहेत. यंदाचा हा हंगाम वादात सापडला आहे. या वादात एक खेळाडू नाही तर संपूर्ण टीम अडकली आहे. 

रणजी ट्रॉफीचा दुसरा क्वार्टरफायनल सामना मुंबई विरुद्ध उत्तराखंड रंगला. या सामन्यात मुंबई टीमने 725 धावांनी विक्रमी विजय मिळवला. पण यानंतर काही वेळातच खळबळजनक बातमी समोर आली. त्यानंतर उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनला पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावे लागले.

मीडिया रिपोर्टनुसार कागदावर लाखो रुपये खर्च केले असं दाखवणाऱ्या उत्तराखंडच्या टीममधील खेळाडूंना केवळ 100 रुपये दैनिक भत्ता दिला जातो. उत्तराखंडने या आरोपाला फेटाळून लावलं. मात्र खेळाडूंचा खाण्यावरील खर्च पाहिल्यानंतर मात्र सगळेच हैराण झाले.  

उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, खेळाडूंच्या जेवणावर 1.74कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर खेळाडूंना देण्यात येणाऱ्या दैनिक भत्त्यावर एकूण 49 लाख 58 हजार रुपये खर्च केला गेला. 

खेळाडूंसाठी केळी खरेदीसाठी एकूण 35 लाख आणि पाण्याच्या बाटल्यांवर 22 लाखांचा खर्च करण्यात आला. त्याचबरोबर 2021-22 मध्ये खेळाडूंसाठी 1250 आणि सपोर्टिंग स्टाफसाठी 1500 दैनंदिन भत्ता ठरवण्यात आला आहे. हा सगळा प्रकार पाहून BCCI चे अधिकारीही चक्रावले आहेत. आता हे प्रकरण नेमकं कोणतं वळण घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.