When and Where to watch PKL 11 Live: प्रो कबड्डी लीगचा (PKL) 11वा सीझन 18 ऑक्टोबरपासून म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. हा सीजन सुमारे अडीच महिने चालेल आणि अंतिम सामना डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारी 2025 च्या सुरुवातीच्या आठवड्यात होईल. अंतिम सामन्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. हैदराबादमधील गचीबोवली येथील जीएमसीबी इनडोअर स्टेडियममध्ये पहिला सामना होणार आहे. सिजनची सुरुवात तेलुगु टायटन्स विरुद्ध बेंगळुरू (TEL vs BLR) सामन्याने होईल. याशिवाय यू मुंबा आणि दबंग दिल्ली या प्रो कबड्डी लीगचे दोन माजी चॅम्पियन संघ देखील आमनेसामने येणार आहेत.
स्पर्धेची सुरुवात तेलुगु टायटन्स विरुद्ध बेंगळुरू बुल्स या सामन्याने होणार आहे. प्रो कबड्डी लीगमध्ये टायटन्स कधीही चॅम्पियन बनले नाहीत आणि गेल्या सिजनमध्ये ते पॉइंट टेबलमध्ये 10व्या स्थानावर होते. भारतीय राष्ट्रीय कबड्डी संघाचा कर्णधार पवन सेहरावतच्या नेतृत्वाखाली तेलुगू टायटन्सला सीझन 4 पासून सुरू असलेला प्लेऑफचा दुष्काळ यंदा संपवायचा आहे .त्याचा सामना बेंगळुरू बुल्सशी होईल, जो सीझन 6 चा चॅम्पियन ठरला होता.
लवकरच होणार Hockey India League साठी लिलाव; पीआर श्रीजेशने आधीच घेतले आपले नाव मागे
आजच्या दुसऱ्या सामन्यात दबंग दिल्ली आणि यू मुंबा या चॅम्पियन यांच्यात सामना होणार आहे. दिल्लीने सीझन 8 मध्ये प्रो कबड्डी लीगचे विजेतेपद जिंकले आणि मागील सलग 6 हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. तर अनूप कुमारच्या नेतृत्वाखाली यू मुंबा दुसऱ्या सत्रात चॅम्पियन बनला होता, पण त्यानंतर कधीही विजेतेपद मिळवू शकला नाही.
Kho Kho World Cup: भारतात होणारा पहिला खो खो विश्वचषक! जाणून घ्या डिटेल्स
टीव्हीवर प्रो कबड्डी लीगचा आनंद घेण्यासाठी स्टार स्पोर्ट्स हे चॅनेल आहे. यःशिवाय ओटीटीवरून आनंद घ्यायचा असल्यास तुम्ही सामने डिस्ने हॉटस्टार ॲपवर थेट पाहू शकता. आजचा पहिला सामना तेलुगु टायटन्स विरुद्ध बेंगळुरू बुल्स सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. दिल्ली विरुद्ध मुंबई सामना 9 वाजता सुरू होईल.