'पाक' चाहत्यांनी आपल्याच क्रिकेटरला धुतला, कोहलीला केलं Like

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याचे केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानमध्येही विराट कोहलीचे फॉलोअर्स आहेत.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 23, 2017, 06:22 PM IST
'पाक' चाहत्यांनी आपल्याच क्रिकेटरला धुतला, कोहलीला केलं Like  title=
File Photo

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याचे केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानमध्येही विराट कोहलीचे फॉलोअर्स आहेत.

पाकिस्तानात विराट कोहलीचे चाहते इतके आहेत की त्यांनी चक्क पाकिस्तानी प्लेअरला नाकारत विराटला पसंत केलं आहे.

नुकतेच झालेल्या वर्ल्ड XI आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या टी-२० क्रिकेट मॅचमध्ये पाकिस्तानी फॅन्सने विराट कोहलीला खूपच मिस केलं. ज्या घटनेसंदर्भात आम्ही बोलत आहोत त्याचा संबंध एका ट्विटशी आहे.

हे ट्विट पाकिस्तान मेमेज नावाच्या अकाऊंटवरुन ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये प्रश्न विचारला आहे की, पाकिस्तानी क्रिकेटर अहमद शहजाद आणि विराट कोहली यांच्यात कोण चांगला बॅट्समन आहे? तसेच अहमद शहजादसाठी रिट्विट करा आणि विराटसाठी लाईक करा असंही म्हटलं आहे.

या प्रश्नानंतर आलेला निकाल पाकिस्तानसाठी धक्कादायक होता. कारण, ९५% (पाकिस्तानी) नागरिकांनी विराट कोहलीला चांगला बॅट्समन म्हटलं आहे.

एका ट्विटर यूजरने म्हटलं आहे की, "नशीब पाकिस्तानच्या नागरिकांना इतकी तरी अक्कल आहे. सर्वांना माहिती आहे की कुठलीच तुलना नाहीये, कोहली महान आहे".