अजिंक्य रहाणेनं सोशल मीडियावर मानले पंतप्रधानांचे आभार

मुंबईकर क्रिकेटर अजिंक्य रहाणेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राला उत्तर दिलं आहे. रहाणेनं सोशल मीडियावर पंतप्रधानांचे आभारही मानले आहेत. 

Updated: Sep 23, 2017, 03:44 PM IST
अजिंक्य रहाणेनं सोशल मीडियावर मानले पंतप्रधानांचे आभार  title=

मुंबई : मुंबईकर क्रिकेटर अजिंक्य रहाणेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राला उत्तर दिलं आहे. रहाणेनं सोशल मीडियावर पंतप्रधानांचे आभारही मानले आहेत. 

नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाच्या या बॅट्समनला 'स्वच्छता ही सेवा' अभियानात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं होतं. रहाणेनं पंतप्रधान मोदी यांच्या पत्राचा फोटो ट्विटर आणि इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे. 

त्याचं उत्तर देताना रहाणेनं लिहिलं आहे की, आदरणीय नरेंद्र मोदीजी, तुमचं पत्र मिळाल्यानं मी फारच आनंदीत झालो आहे. 'स्वच्छता ही सेवा' अभियानात सहभागी होणं ही माझ्यासाठी सन्मानजनक बाब आहे.