Mohammad Siraj चं सामान चोरीला! ढाका ते दिल्ली प्रवासात असं काय घडलं?

Siraj's bag was stolen: भारतात येण्यासाठी टीम इंडियाने ढाका (Dhaka) येथून विमान पकडलं. मोहम्मद सिराजला ढाकाहून दिल्लीकडे (Delhi) प्रवास करणार होता.

Updated: Dec 28, 2022, 05:07 PM IST
Mohammad Siraj चं सामान चोरीला! ढाका ते दिल्ली प्रवासात असं काय घडलं? title=
mohammad siraj

Mohammad siraj bag lost : भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका आणि दोन कसोटी सामने खेळले गेले. या सामन्यात भारताने (India) यजमान बांग्लादेशला (Bangladesh) लोळवलं. त्यानंतर सर्व खेळाडू मायदेशी परतले आहेत. त्यानंतर आता टीम इंडिया (Team India) श्रीलंकेविरुद्ध दोन हात करणार आहे. अशातच आता बांग्लादेशवरून परत येताना भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad siraj bag lost) यांचं सामान चोरीला गेल्याची घटली आहे. (mohammad siraj bag lost while travelling from bangladesh airlines come in action after tweet marathi news)

भारतात येण्यासाठी टीम इंडियाने ढाका (Dhaka) येथून विमान पकडले. मोहम्मद सिराजला ढाकाहून दिल्लीकडे (Delhi) प्रवास करणार होता. त्यानंतर सिराज दिल्लीहून मुंबईकडे विमानाने प्रवास (Travel by plane) करणार होता. याच वेळी सिराजचं बॅग चोरीला (Siraj's bag was stolen) गेल्याची माहिती मिळाली आहे.

आणखी वाचा - IND vs SL: Team India च्या सिलेक्शन मागील Inside Story; कोणाचं प्रमोशन कोणाचं डिमोशन?

सिराजने ट्विट करत बॅग चोरी केल्याची माहिती दिली. त्या बॅगेत माझ्या सर्व आवश्यक गोष्टी होत्या. मी तुम्हाला विनंती करतो की, त्याला शोधण्याची प्रक्रिया सुरू करा आणि त्याला लवकरात लवकर हैदराबादला पाठवा, असं सिराजने म्हटलं आहे. सिराजच्या ट्विटनंतर (Mohammad siraj Tweet) एअरलाईन्स कंपनी (Airlines Company) अॅक्शन मोडवर आल्याचं पहायला मिळतंय.

पाहा ट्विट -

दरम्यान, मी 26 तारखेला ढाकाहून दिल्ली मार्गे अनुक्रमे UK182 आणि UK951 या फ्लाइटने मुंबईला (Mumbai) जात होतो. मी तीन पिशव्या तपासल्या होत्या त्यापैकी 1 बॅग सापडली नाही. मला खात्री होती की, बॅग सापडेल आणि काही वेळात डिलिव्हरी होईल पण आजपर्यंत याची काहीही माहिती मिळाली नाही, याची खंत देखील सिराजने यावेळी व्यक्त केली होती.