Elephanta Caves Gharapuri island : 18 डिसेंबर 2024 रोजी मुंबईत गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्राजवळ एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट बुडाली. मुंबईत गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्राजवळ प्रवासी बोट बुडाली. यामुळे एलिफंटा चर्चेत आले आहे. एलिफंटा हे भर समुद्रात असलेलं मुंबईजवळचं सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. मुंबईतील घारापुरी लेणी ही एलिफंटा नावाने ओळखली जाते. घारापुरी बेटावर डोंगरात पाच लेण्या खोदलेल्या आहेत. एलिफंटा बेटावर जाण्यासाठी बोटीशिवाय पर्याय नाही. गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाण्यासाठी बोटी सुटतात. फक्त गेट वे ऑफ इंडियाच नाहीच तर आणखी काही पर्यायी मार्ग आहेत. या मार्गाने देखील एलिफंटाला जाता येते. जाणून घेऊया एलिफंटाला जाणारे हे पर्यायी मार्ग कोणते?
एलिफंटा हे मंबईतील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. मुंबईपासून 6 ते 7 मैल अंतरावर समुद्रातील घारापुरी या लहान बेटावरील डोंगरात एलिफंटा लेणी आहेत. या लेणी भव्य आकाराच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत. पाषाणात खोदलेल्या या लेणी नवव्या ते तेराव्या शतकाच्या कालखंडातील आहेत. 1987 साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला गेला. घारापूरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते. यावरुनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले.
एलिफंटा लेण्यांमध्ये प्राचीन गुहा आहेत. या गुहा पर्यटकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदु आहे. या लेणीत कोरलेली शिल्पे ही मध्ययुगीन रॉक-कट कला आणि उत्कृष्ट वास्तुकलेचा हा एक सुंदर नमुना आहे. येथे एकूण 7 गुहा आहेत. ही बौद्धकालीन आहे. तसेच येथे प्राचीन शिवमंदिर देखील आहे.
वर्षभरात देश विदेशातील लाखो पर्यटक एलिफंटा लेणीला भेट देतात. एलिफंटा लेणीत प्रवेशासाठी भारतीय पर्यटकांसाठी 40 रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. तर, परदेशी पर्यटकांकडून 600 रुपये प्रवेश शुल्क घेतले जाते. 15 वर्षाखालील मुलांकडून कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आाकारले जात नाही.
मोठ्या संख्येने पर्यटक हे गेट वे ऑफ इंडिया येथूनच एलिफंटाला जातात. गेट वे ऑफ इंडिया येथून सकाळी 9 वाजता एलिफंटाकडे जाणारी पहिली बोट सुटते. तर, गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाणारी शेवटची बोट दुपारी 3.30 वाजता सुटते. तर, एलिफंटाहून 12 वाजता गेट वे ऑफ इंडियाडे येणारी पहिली बोट सुटते. एलिफंटाहून गेट वे ऑफ इंडियाला येणारी शेवटची बोट ही सायंकाळी 6.30 वाजताची आहे.
गेट वे ऑफ इंडियाशिवाय या मार्गाने एलिफंटाला जाता येते.
गेट वे ऑफ इंडिया प्रमाणेच मुंबईच्या डॉक यार्ड रोड येथील भाऊचा धक्का येथून देखील एलिफंटाला जाता येते. भाऊचा धक्का येथून एलिफंटाला जाण्यासाठी बोटी सुटतात. भाऊचा धक्का येथून एलिफंटाला जाण्यासाठी दीड तासांचा वेळ लागतो. यासह नवी मुंबईच्या बेलापुर जेट्टी येथून देखील एलिफंटाला जाण्यासाठी बेट मिळते. बेलापुरहून एलिफंटाला जाण्यासाठी 45 मिनीट लागतात. तसेच नवी मुंबईतील उरण येथील मोरा जेट्टी येथूनही बोटीने एलिफंटाला जाता येते.