Suryakumar Yadav नावाचं तुफान काही थांबेना; उपकर्णधारपद मिळाल्यानंतर रणजीत तळपली बॅट

मुंबईकडून खेळताना सूर्याने रणजी ट्रॉफी 2022-23 सिझनमध्ये पुन्हा एकदा उत्तम फलंदाजी करत सर्वांचं मन जिंकलं आहे. या स्पर्धेत पहिल्या सामन्यात तो 90 रन्सवर आऊट झाला होता, तर आता दुसऱ्या सामन्यात त्याने धुमाकूळ घातला आहे.

Updated: Dec 28, 2022, 04:11 PM IST
Suryakumar Yadav नावाचं तुफान काही थांबेना; उपकर्णधारपद मिळाल्यानंतर रणजीत तळपली बॅट title=

Suryakumar Yadav : भारतीय क्रिकेट टीमचा (Team India) स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये (International Cricket) त्याच्या खेळीने तुफान आणलंय. यानंतर आता त्याने रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) देखील त्याचं नाव खणखणीत वाजवलंय. सौराष्ट्रच्या गोलंदाजांसमोर त्याने पुन्हा एकदा तुफान फलंदाजी केली आहे. मुंबईकडून खेळताना सूर्याने रणजी ट्रॉफी 2022-23 सिझनमध्ये पुन्हा एकदा उत्तम फलंदाजी करत सर्वांचं मन जिंकलं आहे. या स्पर्धेत पहिल्या सामन्यात तो 90 रन्सवर आऊट झाला होता, तर आता दुसऱ्या सामन्यात त्याने धुमाकूळ घातला आहे.

Suryakumar Yadav ने सौराष्ट्र गोलंदाजांची केली धुलाई

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ला नुकतंच बांगलादेशाविरूद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये खेळण्याची संधी दिली नाही. ज्यानंतर त्याने रणजी ट्रॉफीमध्ये त्याचा खेळ दाखवून दिला. 3 डिसेंबरला त्याने मुंबईसाठी पहिला सामना खेळला होता, ज्यामधील पहिल्या डावात त्याने 90 रन्सची तुफान खेळी केली. तर दुसऱ्या सामन्यात 95 रन्सची धडाकेबाज खेळी करत तो पव्हेलियनमध्ये परतला. यावेळी पुन्हा एकदा तो शतक करण्यापासून हुकला आहे.

सौराष्ट्रविरूद्धच्या सामन्यामध्ये सूर्याने 14 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 95 रन्सची खेळी केली. मात्र यामध्ये सलग दुसऱ्या सामन्यात सूर्याचं शतक हुकल्याने चाहते मात्र काहीसे निराश झाले आहेत. सौराष्ट्रने पहिल्या डावात 289 रन्स केले होते, यानंतर मुंबईने 4 विकेट्स गमावून 159 रन्स केलेत.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सिरीजमध्ये सूर्यकुमार यादवकडे सोपवलं उपकर्णधारपद

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि वनडे सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा अखेर करण्यात आली आहे. बीसीसीआयने मंगळवारी रात्री उशिरा ही घोषणा केली आहे. यामध्ये हार्दिक पांड्याकडे टी-20 सिरीजसाठी टीमचं कर्णधारपद सोपवण्यात आलंय. याशिवाय वनडे सिरीजमध्ये रोहित शर्मा टीमचं नेतृत्व करेल. यामध्ये मराठमोळा खेळाडू सूर्याकुमार यादवला लॉटरी लागली आहे. सूर्यकुमार यादवला टी-20 टीमचं उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. 

टी-20 सिरीजसाठी टीम इंडिया

हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वाशिंगटन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार