मुंबई: इंडियन प्रीमियर लीग 9 एप्रिलपासून सुरू होत आहे. 14व्या हंगामाआधी CSKचं टेन्शन मात्र वाढलं आहे. यंदा आयपीएलची ट्रॉफी जिंकण्यासाठी CSK जोमानं तयारी करत आहे. संघातील अनुभवी खेळाडू सुरेश रैनाही संघात परतल्यानं उत्साहाचं वातावरण आहे. तरी CSKच्या डोक्यावर अजून टेन्शन आहेच.
CSK संघाचा सामनावीर आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा अद्याप संघात परतला नाही. त्यामुळे तो यंदाचं IPL खेळणार की नाही याबाबत अद्याप सस्पेन्स आहे. त्यामुळे संघाचंही टेन्शन वाढलं आहे. सर्वजण तो संघात कधी परतणार याची आतूरतेनं वाट पाहात आहेत.
ऑस्ट्रेलिया दौर्यादरम्यान रवींद्र जडेजाला अंगठ्याला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून तो संघामधून बाहेर आहे. रवींद्र जडेजाला विश्रांती देण्यात आली होती. रवींद्र जडेजा संघात कधी सामील होणार याबाबत अद्याप सीएसकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही मौन बाळगलं आहे. त्यामुळे काहीसं संघात तणावाचं वातावरण आहे.
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज पहिला सामना मुंबईत खेळण्यासाठी येणार आहे. त्यामुळे 26 मार्चला ट्रायडंट हॉटेलमध्ये CSKची टीम पोहोचणार आहे.
चेतेश्वर पुजारा आणि प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग काही खेळाडूंसह तेथे पोहोचले आहेत. 27 मार्चपासून चेन्नईची टीम सराव सुरू करणार आहे.