मुंबई : आयपीएलच्या अकराव्या हंगामासाठी बोली न लागलेला श्रीलंकन गोलंदाज लसिथ मलिंगाचे मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन झाल्याने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी ही गुडन्यूज आहे. मलिंगा आता मैदानात नसेल. मात्र तो गोलंदाजाना मार्गदर्शन करणार आहे.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या दबदबा राहिला आहे. गेली १० वर्ष मुंबई इंडियन्स संघाच्या गोलंदाजीची धुरा सांभाळणारा जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगा आता नव्या भूमिकेत दिसणार आहे.
नव्याने झालेल्या लिलावात मुंबईने मलिंगावर बोली लावली नव्हती, मात्र अकराव्या हंगामासाठी मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापनाने लसिथ मलिंगाला गोलंदाजी मार्गदर्शक म्हणून संघात सहभागी करुन घेतले आहे.
मलिंगा आता संघात मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे याचा फायदा नव्या दमाच्या गोलंदाजांना होणार आहे, असे मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई इंडियन्समध्ये मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने, गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड, फलंदाजी प्रशिक्षक रॉबिन सिंह आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जेम्स पेमेंट यांच्यासह मलिंगाही मुंबईच्या गोलंदाजांना आपल्या टीप्स देताना दिसणार आहे.