Indian Team Holi Celebration: विराट कोहलीचा शुभमनसह Baby Calm Down गाण्यावर डान्स, रोहित शर्माने कॅमेरा पाहताच....

Indian Team Holi Celebration: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या ऑस्ट्रेलियाविरोधातील (Australia) चौथ्या कसोटी सामन्यासाठी (Test Match) तयारी करत आहे. दरम्यान, याआधी त्यांचा बसमध्ये होळी साजरी (Holi Celebration) करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. शुभमन गिलने (Shubhman Gill) हा व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) डान्स करताना तर रोहित शर्मा (Rohit Sharma) रंगांची उधळण करताना दिसत आहे.   

Updated: Mar 7, 2023, 08:30 PM IST
Indian Team Holi Celebration: विराट कोहलीचा शुभमनसह Baby Calm Down गाण्यावर डान्स, रोहित शर्माने कॅमेरा पाहताच.... title=

Indian Team Holi Celebration: आज संपूर्ण देशभरात होळी साजरी (Holi Celebration) होत असताना भारतीय क्रिकेट संघानेही (Indian Cricket Team) रंगांची उधळण करत सण साजरा केला आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरोधातील (Australia) चौथ्या कसोटी सामन्यासाठी (Test Match) तयारी करत आहे. अहमदाबादमधील (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये (Narendra Modi Stadium) सराव केल्यानंतर संघ पुन्हा हॉटेलवर परतत असताना बसमध्येच खेळाडूंनी होळी साजरी केली. शुभमन गिलने (Shubhman Gill) बसमधील व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) तरुण खेळाडूंसोबत होळी साजरी करताना दिसत आहेत. 

शुभमन गिलने बसमधील व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत विराट कोहली हातात बॅग घेतलेली असून Baby Calmdown गाणं गात डान्स करताना दिसत आहे. यावेळी शुभमनचा चेहरा रंगाने माखलेला दिसत आहे. शुभमन यावेळी बसमध्ये नेमकी कशा पद्दतीने खेळाडू होळी साजरी करत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. 

शुभमन व्हिडीओ रेकॉर्ड करत असल्याची रोहित शर्माला कोणतीही कल्पना नव्हती. रोहित खेळाडूंच्या अंगावर रंग फेकत असतानाच व्हिडीओ रेकॉर्ड होत असल्याचं पाहिल्यानंतर त्याचा उत्साह अजूनच वाढतो आणि गिल, विराटवर रंग फेकण्यास सुरुवात करतो. यानंतर विराट लगेचच बसमधून खाली उतरतो. 

शुभमनने व्हिडीओ शेअऱ केलेला असताना रोहित शर्माने बसमध्ये होळी साजरी केल्याचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सूर्यकुमार यादव, चेतेश्वर पुजारा, अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज असे अनेक खेळाडू दिसत आहेत. रोहित शर्माने चाहत्यांना होळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. 

भारतीय क्रिकेट संघ सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यासाठी तयारी करत आहे. चार सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे. दोन सामन्यातील पराभवानंतर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने कमबॅक करत 9 गडी राखत सामना जिंकला. जर भारताने चौथा सामना जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या अंतिम सामन्यासाठी पात्र होणार आहे. जून महिन्यात लंडनमध्ये हा सामना होणार आहे. इंदूर टेस्टमधील विजयासह ऑस्ट्रेलियाने आपलं स्थान पक्कं केलं आहे.