"मला शिवी देत तो म्हणाला, तू काय..."; रोहित शर्मा सहकाऱ्यांना मैदानात शिव्या देतो म्हणत सांगितला किस्सा

Rohit Sharma Abuse During Match: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाने इंडियन प्रिमियर लीग स्पर्धेचं जेतेपद तब्बल 5 वेळा जिंकलं असून यंदा ते आरसीबीच्या विरुद्धच्या सामन्यापासून आपली आयपीएलची मोहीम सुरु करतील.

Updated: Mar 7, 2023, 07:08 PM IST
"मला शिवी देत तो म्हणाला, तू काय..."; रोहित शर्मा सहकाऱ्यांना मैदानात शिव्या देतो म्हणत सांगितला किस्सा title=
Rohit Sharma

Rohit Sharma Abuse in Match: ईशान किशन (Ishan Kishan) आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) इंडियन प्रमियर लिगमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात. दोघांमधील बॉण्डींगही अगदीच चांगली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने विक्रमी वेळा म्हणजेच 5 वेळा आयपीएलचा चषक जिंकला आहे. नुकतेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक साजरं केलेल्या भारतीय संघातील या विकेटकिपरने मागील वर्षी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अनेक मजेदार किस्से शेअर केले होते. यात त्याने रोहित शर्माबद्दलचीही गुपिती उघड केली होती. ईशानने यावेळी बोलताना रोहित शर्मा सामन्यादरम्यान कधी कधी खेळाडूंना शिव्याही घालतो. एकदा दोनदा मलाही याचा सामना करावा लागला होता, असं सांगितलं.

त्याचं फार डोकं चालतं...

डावखुऱ्या हाताचा फलंदाज असलेल्या ईशानने एप्रिल 2021 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाचं फार कौतुक केलं होतं. मैदानावर असताना रोहितचं डोकं फार चालतं असं ईशान म्हटला होता. तो फार शांत असतो आणि तो जे करतो ते डावपेच नेहमीच यशस्वी ठरतात. "एकदा फलंदाज स्ट्राइकवर आला तेव्हा त्याने अशी फिल्डींग का लावली नाही असा मला प्रश्न पडला. मात्र त्यानंतर असं झालं काही घडलं जे रोहितच्या मनात होतं," असं ईशानने सांगितलं.

सर्वाधिक किंमतीला विकला गेलेला खेळाडू

ईशान किशनला मागील आयपीएल ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने 15.25 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. त्या पर्वामध्ये तो सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक ठरला होता. ईशानने एका आयपीएल सामन्याचा किस्सा सांगताना, "रोहित नेहमी शांत असतो. मात्र सामन्यादरम्यान एखाद्या सहकारी खेळाडूने चूक केली तर तो शिव्याही देतो. सामना संपल्यानंतर तो सर्वांना सांगतो की जे काही घडलं ते मनाला लावून घेऊ नका. सामन्यादरम्यान असं घडतं, असं तो सांगतो," अशी माहिती ईशानने दिली.

एकदा मलाही शिव्या दिलेल्या

आपल्यालाही एकदा रोहितच्या शिव्या खाव्या लागल्या होत्या असं ईशानने सांगितलं. "जुन्या चेंडूंमुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होतो. एकदा चेंडू खराब करण्याच्या उद्देशाने तो जमीनीवर आपटला. फार दवं पडत असल्याने असा प्रयत्न करण्यात आला. मी चेंडू जमीनीवर आपटत रोहितच्या दिशेने फेकला. त्यानंतर त्याने चेंडू उचलून रुमालाने पुसला. मला शिवी देत तो म्हणाला, तू काय करतोयस? त्यानंतर त्याने मला घडलेला प्रकार मनाला लावून घेऊ नकोस असंही सांगितलं. सामन्यात असं घडतं, असंही तो म्हणाला होता," अशी आठवण ईशानने सांगितली होती.

पहिला सामना आरसीबीविरुद्ध

मुंबई इंडियन्स यंदाच्या आयपीएल पर्वाची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाविरुद्धच्या सामन्यापासून करणार आहे. दोन्ही संघ 2 एप्रिल रोजी आमने-सामने असतील. चिन्नास्वामी मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे.