IND VS AUS 1st ODI Womens : एकीकडे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात पुरुष संघामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे (Border Gavaskar Trophy) सामने सुरु असताना दुसरीकडे दोन्ही देशांच्या महिला संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे सिरीज सुरु आहे. भारताचा महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवारी पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताच्या महिला संघाला अवघ्या 100 धावांवर ऑल आउट केले तर फलंदाजी करून अवघ्या 17 ओव्हरमध्ये वनडे सामना जिंकला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या महिला संघांमध्ये पार पडलेला पहिल्या वनडे सामन्याचा टॉस भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने जिंकला. हरमनप्रीतने प्रथम फलंदाजी निवडली आणि ऑस्ट्रेलियाला गोलंदाजीचे आव्हान दिले. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी समोर टीम इंडिया गडगडली. हरलीन देओल (19), हरमनप्रीत कौर (17), जेमिमा रॉड्रिग्स (23), रिचा घोष (14) इत्यादी फलंदाज वगळता कोणालाही दोन अंकी धाव संख्या करता आली नाही. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताच्या एकाही फलंदाजाला मैदानात स्थिरावू दिले नाही. त्यामुळे एका मागोमाग एक भारताच्या विकेट्स पडल्या आणि संपूर्ण टीम इंडिया 100 धावांवर ऑल आउट झाली. 35 व्या ओव्हरला ऑस्ट्रेलियाने भारताच्या सर्व विकेट्स घेतल्या. मेगन शुट हिने टीम इंडियाच्या तब्बल 5 फलंदाजांच्या विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 101 धावांचे आव्हान मिळाले होते. ऑस्ट्रेलिया हे लक्ष सहज पार करेल अशी अपेक्षा होती, मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांना त्यांच्या 5 विकेट्स घेण्यात यश आले. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा या फोबी लिचफिल्ड (35), जॉर्जिया व्हॉल (46) यांनी केल्या. 16.2 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाने 102 धावा केल्या आणि 5 विकेट्स राखून विजय मिळवला. वनडे सीरिजमधील पहिल्याच सामन्यात विजय मिळवल्याने ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
हेही वाचा : IND VS AUS डे अँड नाईट टेस्ट मॅच किती वाजता सुरु होणार? कुठे पाहता येणार Live?
प्रिया पुनिया, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, तितास साधू, प्रिया मिश्रा, सायमा ठाकोर, रेणुका ठाकूर सिंग
फोबी लिचफिल्ड, जॉर्जिया वॉल, एलिस पेरी, बेथ मूनी (विकेटकीपर), ॲनाबेल सदरलँड, ॲशलेग गार्डनर, ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), जॉर्जिया वेयरहॅम, अलाना किंग, किम गर्थ, मेगन शुट