IND vs PAK: टॉसच्या वेळी Rohit Sharma ने केली ही मोठी चूक; चाहत्यांनाही विश्वास बसेना!

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

Updated: Oct 23, 2022, 04:00 PM IST
IND vs PAK: टॉसच्या वेळी Rohit Sharma ने केली ही मोठी चूक; चाहत्यांनाही विश्वास बसेना! title=

मेलबर्न : अखेर भारताने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सुरुवात केली. पाकिस्तानशी सुरु असलेल्या हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानने भारताला 160 रन्सचं आव्हान दिलं आहे. दरम्यान सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 वर्ल्डकपच्या सामन्यात टॉससाठी मैदानात येताना भली मोठी चूक केली. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

कर्णधार रोहितकडून घडली मोठी चूक 

टॉस जिंकल्यानंतर रोहित शर्माने कॉमेंट्रिटर रवी शास्त्री यांना टीमच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल माहिती देताना मोठी चूक केली. रवी शास्त्रींना टीम इंडियाचं प्लेइंग इलेव्हन सांगताना रोहित शर्मा म्हणाला, आजच्या सामन्यात आम्ही 7 फलंदाज, 3 वेगवान गोलंदाज आणि 2 स्पिनर गोलंदाजांसह मैदानात उतरलो आहोत.

टॉस जिंकल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, "माझी टीम पहिल्यांदा फिल्डींगसाठी उतरणार आहे. याशिवाय चांगली खेळपट्टी असून ढगाळ वातावरणात गोलंदाजी करणं उत्तम राहील. आजच्या सामन्यासाठी आमची तयारी चांगली झाली आहे. आम्ही ब्रिस्बेनमध्ये काही सराव सामने खेळलोय. पाकिस्तानविरूद्ध आम्ही 7 फलंदाज, 3 वेगवान गोलंदाज आणि 2 स्पिनर गोलंदाजांसह मैदानात उतरलो आहोत."

प्लेअर मोजताना केली चूक

रोहित शर्माने मोजताना, तो टीम इंडियातील 12 खेळाडूंची माहिती देत ​​होता, पण क्रिकेट सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये केवळ 11 च खेळाडू असतात. भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग भारतासाठी फास्ट बोलर्सची जबाबदारी सांभाळणार आहे. अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन फिरकी गोलंदाजी सांभाळत आहेत.