Bharatpol Portal: सध्या इंटरनेटवर भारतपोलची चर्चा आहे. हे एक पोर्टल असून याचा संबंध देशातील सर्वसामान्य नागरिकांशी जोडला गेलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याचे उद्घाटन करतायत. या पोर्टलच्या माध्यमातून देशातून पळणाऱ्या नागरिकांवर नजर असणार आहे. नक्की काय आहे हे पोर्टल? सविस्तर समजून घेऊया. इंटरपोलच्या धर्तीवर भारतपोलचे निर्माण करण्यात आले आहे. यामुळे शोध पथकाला सायबर आणि आर्थिकसह अनेक गुन्ह्यांमध्ये आंतरराष्ट्रीय पोलिसांची तात्काळ मदत घेता येणार आहे.
सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने भारत पोल पोर्टलची निर्मिती केली आहे. याच्या मदतीने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या पोलिसांनादेखील मदत होणार आहे. गुन्हे करुन परदेशात पळालेल्या गुन्हेगारांची माहिती शोध पथक आणि राज्याच्या पोलिस इंटरपोलकडे मागू शकणार आहेत. पोर्टलच्या माध्यमातून सीबीआय कोणत्याही केसमध्ये सहकार्य मागू शकते. इंटरपोलचे इतर सदस्य देशांच्या शोध पथकाकडेदेखील माहिती मागितली जाईल. इतर देशांच्या सहकार्यासाठी क्राइम डेटा आणि गुप्त माहिती शेअर केली जाऊ शकते.
गृह मंत्रालयाने X वर पोस्ट करून कार्यक्रमाची माहिती दिली. जगभरात सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, ऑनलाइन दहशतवाद, संघटित गुन्हेगारी, अंमली पदार्थांची तस्करी, मानवी तस्करी आदींसह आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. अशा गुन्ह्यात अडकलेले गुन्हेगार गुन्हा करुन इतर देशात पळून जातात. अशावेळी त्यांना पकडणे स्थानिक पोलिसांसाठी आव्हान बनून जाते. मग तपासादरम्यान अनेक वेळा इतर देशांची मदत घ्यावी लागते.
देशात गुन्हे करून परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांना परत आणून त्यांना शिक्षा करणे हे आजही सुरक्षा यंत्रणांसमोर आव्हान आहे. यासाठी भारतीय एजन्सी इंटरपोल आणि इतर परदेशी सुरक्षा संस्थांची मदत घेतात. आता भारतपोलच्या माध्यमातून इंटरपोल आणि इतर देशांतून गुन्हेगारांचा डाटा तात्काळ उपलब्ध होणार आहे.
भारतपोल पोर्टल काय आहे? हे समजून घेऊया. भारतपोल पोर्टल हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरू केलेले डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. कायदा आणि सुव्यवस्था सुधारणे आणि नागरिकांना विविध पोलिस सेवा डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देणे हा यामागचा हेतू आहे. यनागरिकांना पोलीस सेवा, तक्रारी दाखल करणे आणि पोलीस संबंधित माहिती पारदर्शक करण्यासाठी एकात्मिक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणे पोर्टलचा मुख्य उद्देश आहे.
भारतपोल पोर्टलचा वापर भारतातील सर्व नागरिक करू शकतात, पोलीस सेवा आणि तक्रारींचे ऑनलाइन निराकरण करायचे आहे, ते या पोर्टलचा वापर करु शकतात. तक्रारी दाखल करणे, पोलिसांशी संबंधित प्रमाणपत्रे घेणे, गुन्ह्यांशी संबंधित माहिती देणे यासारख्या सर्व सेवा या एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील. भारतपोल पोर्टल 7 जानेवारी 2025 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत सुरू केले आहे.