शाहिद कपूरचा 'देवा' : बॉक्स ऑफिसवर 'सिंघम'ला टक्कर देणारा एक नवा सुपरहिरो?

अजय देवगणला बॉलिवूडमध्ये 'सिंघम' म्हणून ओळखलं जातं. ज्याचे प्रत्येक डायलॉग आणि ॲक्शन सीन प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्याच्या बळकट आणि रागीट नायकाच्या भूमिकेने त्याला सुपरहिरो स्टेटस मिळवून दिलं. परंतु आता त्याला टक्कर देण्यासाठी शाहिद कपूर 'देवा' हा चित्रपट घेऊन येत आहे. 

Intern | Updated: Jan 7, 2025, 12:50 PM IST
शाहिद कपूरचा 'देवा' : बॉक्स ऑफिसवर 'सिंघम'ला टक्कर देणारा एक नवा सुपरहिरो? title=

शाहिद कपूरच्या आगामी चित्रपट 'देवा'च्या टीझरने त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. त्याच्या लूक आणि दमदार अभिनयाने सिनेमाच्या भवितव्यावर नवीन चर्चा सुरू झाली आहे. 'देवा'मध्ये शाहिद कपूर एका अत्यंत रागीट तरुणाच्या भूमिकेत दिसत आहे, हा एक ॲक्शन चित्रपट आहे. या चित्रपटात तो आपल्या भावनांशीचं लढत आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये त्याचा लूक आणि अभिनय त्याच्या जुन्या हिट भूमिकांपेक्षा खूप वेगळा आहे. त्याच्या अभिनयात एक प्रकारची गडबड आणि गहनता आहे, जी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण करते. भावनिक गडबड आणि ज्वलंत शॉट्स यांच्या मदतीने शाहिदने 'देवा'च्या पात्राला एक नवीन वळण दिले आहे.

सिनेमाच्या 'अँग्री यंग मॅन'ची ओळख
'देवा' हा एक शक्तिशाली पात्र म्हणून उभा आहे, ज्यात अमिताभ बच्चनच्या 'अँग्री यंग मॅन'च्या पात्राची आठवण करून देणारी शैली आहे. शाहिद कपूरने त्याच्या 'देवा'मध्ये तीव्रता, स्टाईल आणि वर्चस्व आणलं आहे. टीझरमध्ये त्याचे प्रत्येक शॉट्स अगदी प्रभावशाली रितीने दाखवण्यात आले आहे. तो एक संपूर्ण नव्या लूकमध्ये दिसत आहे. ज्यात त्याचे रागीट व्यक्तिमत्त्व आणि त्याचा संघर्ष एकत्रित दिसत आहे.

चित्रपटातील ॲक्शन आणि नृत्य 
टीझरमध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे, 'देवा' ॲक्शन आणि नृत्य दोन्हीमध्ये एकच वेगळा स्तर ठरवणार आहे. शाहिद कपूरने आपल्या नृत्यकौशल्याने सिनेमात एक नवा दर्जा आणला आहे. त्याचे नृत्य सशक्त, आकर्षक आणि प्रेक्षकांना खूपच प्रभावित करणारे आहे. तो ज्या प्रकारे नृत्य करतो, ते प्रेक्षकांना थिएटरमध्ये नाचायला प्रवृत्त करेल.

दिग्दर्शन- रोशन अँड्र्यूजचा चमकदार योगदान
'देवा' चित्रपटाचे दिग्दर्शन रोशन अँड्र्यूज यांनी केले आहे, ज्यांनी चित्रपटात भावना, ॲक्शन आणि भव्यता याचं संमेलन दाखवलं आहे. त्यांचे दिग्दर्शन शैली आणि पद्धत या चित्रपटाला एक नवीन उंचीवर घेऊन जात आहे. त्याच्या दिग्दर्शनामुळे प्रेक्षक चित्रपटाच्या प्रत्येक क्षणाचा अनुभव घेत राहतील आणि सिनेमाचे कथानक आणि भावनात्मक डायलॉग्स अधिक प्रभावी ठरतील.

हे ही वाचा: मंदिरात गेल्याने सारा अली खान ट्रोल! श्रीशैलमच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं पण...

'देवा'च्या भवितव्याचा उत्सुकतेचा उच्चांक

सिनेमाच्या टीझरने प्रेक्षकांमध्ये एक नवा उत्साह निर्माण केला आहे आणि आता सर्वांची नजर ट्रेलरवर आहे. 'देवा' हा 31 जानेवारीला रिलीज होणार आहे. शाहिद कपूरने 'देवा'मध्ये जे काही साकारलं आहे, ते बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास घडवू शकतं.

'देवा' हा चित्रपट एक वेगळी दिशा दाखवतो आणि शाहिद कपूरच्या अभिनयाने त्यात एक नवा दमदार रंग भरला आहे. अजय देवगणच्या 'सिंघम' प्रमाणेच, शाहिद कपूरच्या 'देवा'चा वर्चस्व कदाचित बॉलिवूडमध्ये नवे वळण घेईल.