IND VS AUS डे अँड नाईट टेस्ट मॅच किती वाजता सुरु होणार? कुठे पाहता येणार Live?

IND VS AUS 2nd Test :  दुसरा सामना हा एडिलेड येथे होणार असून हा सामना डे अँड नाईट स्वरूपाचा असेल. त्यामुळे हा टेस्ट सामना पिंक बॉलने खेळवला जाईल.

पुजा पवार | Updated: Dec 5, 2024, 05:49 PM IST
IND VS AUS डे अँड नाईट टेस्ट मॅच किती वाजता सुरु होणार? कुठे पाहता येणार Live? title=
(Photo Credit : Social Media)

IND VS AUS 2nd Test : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Border Gavaskar Trophy) दुसरा सामना शुक्रवारी 6  डिसेंबर पासून सुरु होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर  तब्बल 295 धावांनी विजय मिळवून 5 सामन्यांच्या टेस्ट सीरिजमध्ये 2-0 ने आघाडी घेतली आहे. दुसरा सामना हा एडिलेड येथे होणार असून हा सामना डे अँड नाईट स्वरूपाचा असेल. त्यामुळे हा टेस्ट सामना पिंक बॉलने खेळवला जाईल. वैयक्तिक कारणांमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यात रोहित शर्मा गैरहजर होता. परंतु दुसऱ्या सामान्यापासून टीम इंडिया (Team India) पुन्हा रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात खेळणार आहे.  

डे अँड नाईट टेस्ट मॅच कसा राहिलाय भारताचा परफॉर्मन्स? 

भारताने आतापर्यंत 4 डे अँड नाईट टेस्ट सामने खेळले असून यातील तीन सामन्यात विजय मिळवला आहे तर एका सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तर ऑस्ट्रेलियाने आजतागायत 12 डे अँड नाईट टेस्ट सामने खेळले असून यातील फक्त एकाच सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शेवटचा डे अँड नाईट टेस्ट सामना हा 2020 मध्ये एडिलेड मध्येच झाला होता. यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 विकेट्सने पराभव केला होता. 2020 मध्ये भारतीय संघ दुसऱ्या इनिंगमध्ये केवळ 36 धावांवर ऑल आउट झाला होता. 

भारताची संभाव्य प्लेईंग 11 : 

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, वाशिंगटन सुंदर, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह

हेही वाचा : पंड्याच्या टीमचा वर्ल्ड रेकॉर्ड, केला T20 च्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोअर, 20 ओव्हरमध्ये तब्बल 349 धावा

 

कुठे पाहता येणार सामना? 

एडिलेड येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार दुसरा टेस्ट सामना हा प्रेक्षकांना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्स या चॅनलवर पाहता येईल. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिझनी हॉटस्टारवर करण्यात येईल. 

किती वाजता सुरु होणार सामना? 

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा दुसरा टेस्ट सामना हा ऑस्ट्रेलियाच्या वेळेनुसार दुपारी 2: 30 वाजता सुरु होईल. तर शुक्रवारी 6 डिसेंबर रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 9: 30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. शुक्रवारी सामना सुरु होण्याच्या अर्धातास आधी दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये टॉस होईल.