पिंक बॉल टेस्टमध्ये कशी असेल भारताची प्लेईंग 11, रोहितच्या येण्याने कोणाचा पत्ता होणार कट?

IND VS AUS 2nd Test : पहिल्या टेस्टमध्ये वैयक्तिक कारणांमुळे सहभागी होऊ न शकलेला रोहित शर्मा दुसऱ्या सामान्यापासून टीम इंडियाचं नेतृत्व करेल. त्यामुळे रोहितच्या येण्याने कोणाचा पत्ता कट होणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरेल. 

पुजा पवार | Updated: Dec 5, 2024, 03:29 PM IST
पिंक बॉल टेस्टमध्ये कशी असेल भारताची प्लेईंग 11, रोहितच्या येण्याने कोणाचा पत्ता होणार कट? title=
(Photo Credit : Social Media)

IND VS AUS 2nd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 5 सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळवली जात आहे. 6 डिसेंबर पासून दुसऱ्या टेस्ट सामन्याला सुरुवात होणार असून पिंक बॉलने होणाऱ्या या टेस्ट सामन्यासाठी भारतीय संघ कसून सराव करत आहे. पहिल्या टेस्टमध्ये वैयक्तिक कारणांमुळे सहभागी होऊ न शकलेला रोहित शर्मा (Rohit Sharma)  दुसऱ्या सामान्यापासून टीम इंडियाचं नेतृत्व करेल. त्यामुळे रोहितच्या येण्याने कोणाचा पत्ता कट होणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरेल. 

जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात भारताची विजयी सुरुवात : 

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहकडे टीम इंडियाचं नेतृत्व होतं. या सामन्यात टीम इंडियाने 295 धावांनी ऑस्ट्रेलियावर मोठा विजय मिळवला होता. त्यामुळे टीम इंडियाने सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात बुमराहने उत्कृष्ट गोलंदाजी करून 8 विकेट्स तर विराट आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी शतक ठोकले. 

रोहित शर्माच्या येण्याने कोणाचा पत्ता कट? 

रोहित शर्मा हा दुसऱ्या टेस्ट सामान्यापासून पुन्हा एकदा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तसेच पहिल्या सामन्यात थम इंज्युरीमुळे पहिल्या टेस्ट मधून बाहेर पडलेला शुभमन गिल हा सुद्धा दुसऱ्या सामन्यात टीम इंडियात परतण्याची शक्यता आहे. या दोघांच्या येण्याने  देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल यांचा पत्ता कट होऊ शकतो. रोहित आणि केएल राहुल हे दोघे ओपनिंगसाठी मैदानात उतरतील. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल, चौथ्यावर विराट कोहली तर पाचव्यावर यशस्वी आणि सहाव्या स्थानी ऋषभ पंत फलंदाजीसाठी मैदानात उतरू शकतो. पर्थ टेस्टमध्ये नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांनी टेस्टमध्ये पदार्पण केलं होतं. पुढच्या सामन्यात दोघांची जागा जवळपास निश्चित मानली आहे. 

हेही वाचा : पंड्याच्या टीमचा वर्ल्ड रेकॉर्ड, केला T20 च्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोअर, 20 ओव्हरमध्ये तब्बल 349 धावा

 

अश्विन आणि जडेजाचं पुनरागमन होणार? 

पर्थ टेस्टमध्ये अनुभवी गोलंदाज आर अश्विन आणि ऑल राउंडर रवींद्र जडेजा हे टीम इंडियाच्या प्लेईंग 11 चा भाग नव्हते. अश्विनने टेस्टमध्ये 530 हुन अधिक विकेट घेतलेत तर जडेजाच्या नावावर 300 टेस्ट विकेट्स आहेत. मात्र असं असूनही वॉशिंग्टन सुंदरला पहिल्या टेस्टमध्ये संधी देण्यात आली. तेव्हा दुसऱ्या टेस्टमध्ये अश्विन आणि जडेजा यांचा प्लेईंग 11 मध्ये समावेश होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

भारताची संभाव्य प्लेईंग 11 :

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, वाशिंगटन सुंदर, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह