Yashasvi Jaiswal : पाणीपुरी विक्रीपासून ते टीम इंडियापर्यंत...; डेब्यू कॅप मिळताच भावूक झाला यशस्वी, रोहितला मारली मिठी

Yashasvi Jaiswal : जयस्वाल कर्णधार रोहित शर्मासोबत ओपनिंगला उतरणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी डेब्यू कॅप मिळताच यशस्वी जायसवाल ( Yashasvi Jaiswal ) भावूक झाल्याचं दिसून आलं होतं. 

सुरभि जगदीश | Updated: Jul 12, 2023, 10:06 PM IST
Yashasvi Jaiswal : पाणीपुरी विक्रीपासून ते टीम इंडियापर्यंत...; डेब्यू कॅप मिळताच भावूक झाला यशस्वी, रोहितला मारली मिठी title=

Yashasvi Jaiswal : आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करणार यशस्वी जयस्वालने अखेर टीम इंडियासाठी डेब्यू केलं. वेस्ट इंडिज विरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये यशस्वीने ( Yashasvi Jaiswal ) डेब्यू केलं. या सामन्यामध्ये जयस्वाल कर्णधार रोहित शर्मासोबत ओपनिंगला उतरणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी डेब्यू कॅप मिळताच यशस्वी जायसवाल ( Yashasvi Jaiswal ) भावूक झाल्याचं दिसून आलं होतं. 

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांच्या टेस्ट सिरीजला सुरुवात झाली आहे. यावेळी पहिला सामना 12 जुलै ते 16 जुलै दरम्यान खेळवला जाणार आहे. सामन्याद्वारे 21 वर्षीय युवा फलंदाज यशस्वी जयस्वालला ( Yashasvi Jaiswal ) त्याच्या टेस्ट कारकिर्दीतील पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली. 

भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्या पहिल्या सामन्यात विरोधी टीमने टॉस जिंकला. यावेळी टॉसनंतर कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) टेस्ट डेब्यूची कॅप यशस्वी जयस्वालकडे ( Yashasvi Jaiswal ) सोपवली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये तो खूपच भावूक झाल्याचं दिसून आलंय. भावूक झाल्यानंतर जयस्वालने रोहित शर्माला ( Rohit Sharma ) मिठी देखील मारली. 

ईशान किशनचाही झाला डेब्यू

यशस्वी जयस्वालसोबत इशान किशननेही टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यू केलंय. ईशानला केएस भरतच्या जागी ईशान किशनला टीममध्ये संधी देण्यात आली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो भारतासाठी विकेटकीपिंग करतोय. 

कशी आहे दोन्ही टीम्सची प्लेईंग 11

टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ईशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवि अश्विन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनादकट आणि मोहम्मद सिराज

वेस्ट इंडिज - क्रॅग ब्रैथवेट (कर्णधार), टेगेनरीन चंद्रपॉल, रेमन रीफर, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवाल, अल्झारी जोसेफ, केमर रोच, जोमेल वारिकन