West Indies vs India, 1st Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमघ्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर आज भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिजबरोबर सामना होणार आहे. 3 कसोटी, 2 वनडे आणि 5 टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका दोन्ही संघात खेळवली जाणार आहे. त्यातील पहिला कसोटी सामना आजपासून विंडसर पार्क मैदानावर खेळवला जात आहे. अशातच पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकला (toss Update) असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दोन्ही कसोटी सामने जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. रोहितसोबत सलामीला यशस्वी जयस्वाल उतरणार आहे. तर नंबर तीनवर शुभमन गिल टीम इंडियाची कमान सांभाळेल. तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळेल. उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि इशान किशन यांच्या खांद्यावर मिडल ऑर्डरची जबाबदारी असणार आहे.
नWest Indies have won the toss and elect to bat first in the 1st Test against #TeamIndia.
Live - https://t.co/cuH2WZGEpw #WIvIND pic.twitter.com/2P5lISzV2U
— BCCI (@BCCI) July 12, 2023
रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या दोन फिरकीपटूंना संघात स्थान देण्यात आलंय. तर शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज हे तीन फास्ट बॉलर कंबरडं मोडतील.
भारत आणि वेस्ट इंडिज (West Indies vs India) यांच्यात आतापर्यंत 98 कसोटी सामने झाले आहे. त्यात भारताने 22 कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. तर 30 सामन्यात विंडीजने बाजी मारली आहे. 46 कसोटी सामने अनिर्णित राहिलेले आहेत.
भारत (Playing XI): रोहित शर्मा (C), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (WK), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज
वेस्ट इंडिज (Playing XI): क्रेग ब्रॅथवेट (C), टॅगेनारिन चंदरपॉल, रेमन रेफर, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (WK), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन