Saif Ali Khan Attacker Arrested: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी शनिवारी रात्री ठाण्यातून अटक केली आहे. आरोपीच्या अटकेनंतर आज सकाळी मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत आरोपीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. तसंच, सैफ अली खानवर हल्ला का करण्यात आला याचे कारणदेखील सांगितलं आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील कासारवडवली येथून आरोपीला अटक केली असून त्याचे नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद असं आहे. प्राथमिक तपासानुसार, हा आरोपी बांगलादेशी असल्याचा संशय आहे. आरोपीकडे पोलिसांना कोणतेही भारतीय प्रमाणपत्र सापडलं नसून तो अवैधरित्या भारतात घुसला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आरोपी भारतात अवैधरित्या घुसल्याने त्याने नाव बदललं होतं. भारतात तो विजय दास या नावाने फिरत होता. मागील सहा ते सात महिन्यांपूर्वीच तो मुंबईत आला होता. कधी तो मुंबई उपनगरात राहत होता. सैफ अली खानच्या घरावर हल्ला करण्याच्या 15 दिवस आधी तो मुंबईत आला होता. इथे तो एका हाउस किपिंग एजन्सीमध्ये काम करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीवर कारवाई करण्यात असून पुढील तपास सुरू आहे. आता आरोपीला कोर्टात सादर करणार असून अधिक तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
आरोपी जबरी चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरात शिरला होता, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. चोरीच्या उद्देशाने शिरला असतानाच त्याने सैफ अली खानवर हल्ला केल्याचं त्यानं कबुल केलं आहे.
अभिनेता सैफ अली खान हल्ला करणारा आरोपील मुंबई पोलीसांनी अटक केली आहे. ठाण्याच्या कासरवाडी येथील हिरानंदानी इस्टेटच्या पाठी असलेल्या झुडपातून लपून बसलेला होता. सुरुवातीला त्याने अटकेच्या भीतीने वेगवेगळी नावे सांगितली. हा आरोपी बंगाली भाषेत बोलत आहे. आरोपीला सध्या खार पोलिस ठाण्यात आणलं आहे.