Shukra Gochar 2023 : शुक्र गोचरमुळे 'या' राशींचा गोल्डन टाइम; तर 'या' लोकांवर आर्थिक संकट

Venus Transit 2023 : शुक्रदेव सिंह राशीत गोचर केल्यामुळे पुढील 40 दिवस काही राशींसाठी दिवाळी असणार आहे. मात्र काही राशींना आर्थिक फटकादेखील बसणार आहे. तुमच्यासोबत काय होणार आहे जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Oct 2, 2023, 05:15 AM IST
Shukra Gochar 2023 : शुक्र गोचरमुळे 'या' राशींचा गोल्डन टाइम; तर 'या' लोकांवर आर्थिक संकट title=
Venus Transit in leo on 2nd october these zodiac signs will get happiness and shukra gochar 2023 financial crisis

Venus Transit 2023 : संपत्तीचा कारक शुक्र देव 2 ऑक्टोबर म्हणजे आज कर्क राशीतून सिंह राशीत गोचर करणार आहे. त्यानंतर दिवाळीपूर्वी म्हणजे 3 नोव्हेंबरला कन्या राशीत संक्रमण करणार आहे. तर हाच शुक्र देव 12 नोव्हेंबरला हस्तात आणि 24 नोव्हेंबरला चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे पुढील 40 दिवस काही राशींसाठी दिवाळी असणार आहे. त्या लोकांना मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे. पण काही राशींसाठी शुक्र गोचर संकट ठरणार आहे. चला बघूयात कोणासाठी लकी तर कोणासाठी अनलकी ठरणार आहे शुक्र देव.(Venus Transit in leo on 2nd october these zodiac signs will get happiness and shukra gochar 2023 financial crisis)

'या' राशींचा गोल्डन टाइम!

सिंह (Leo Zodiac) 

सिंह राशीतील शुक्राचं संक्रमण या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहे. करिअरमध्ये प्रगती आणि उत्पन्नात वाढ होणार आहे. प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत. व्यावसायिकांना मोठा नफा लाभणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदी आनंद वातावरण असणार आहे. एखादी चांगली बातमी कानावर पडणार आहे. समाजात मान-सन्मान वाढणार आहे. 

कन्या (Virgo Zodiac) 

शुक्राचं संक्रमण तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. पैसा आणि आर्थिक बाबतीत सुधारणा होणार आहे. नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळणार आहे. कामात यश प्राप्त होणार आहे.  मित्र किंवा नातेवाईकांकडूनही चांगली बातमी कानावर पडणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फलदायी असणार आहे. शिक्षणासाठी परदेशात जाण्याची दाट शक्यता निर्माण होणार आहे. 

तूळ (Libra Zodiac)

शुक्र हा तूळ राशीचा अधिपती आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनाही शुक्र गोचरचा विशेष लाभ होणार आहे. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर तुम्हाला त्यात यश प्राप्त होणार आहे. करिअरसाठी काळ अनुकूल असणार आहे. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होणार आहे. अनपेक्षित आर्थिक लाभ होणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. उत्पन्न वाढ होणार आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ अतिशय भाग्यशाली असणार आहे. तुम्हाला मोठी डील मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यातून तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. 

वृषभ (Taurus Zodiac) 

वृषभ राशीचा शासक ग्रह शुक्र असल्याने या लोकांना फायदा होणार आहे. नोकरीत पदोन्नती आणि वाढ होणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामांना गती मिळणार आहे. स्थावर मालमत्तेशी संबंधित प्रकरणे मार्गी लागेल. घर किंवा वाहन खरेदीचे योग आहेत. मित्र आणि नातेवाईकांकडून चांगली बातमी कानावर पडणार आहे. परदेशात नोकरी करण्याची इच्छा पूर्ण होताना दिसेल. भौतिक सुखात वाढ होणार आहे. 

मिथुन (Gemini Zodiac)

शुक्राचं संक्रमण तुमच्यासाठी शुभ असणार आहे. भौतिक सुख लाभणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळेल. धर्म आणि अध्यात्मातही रुची वाढणार आहे. कौटुंबिक सदस्यांसोबत तुमचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट आणि मजबूत होणार आहे. 

'या' लोकांवर आर्थिक संकट

कर्क (Cancer Zodiac) 

या राशीच्या चौथ्या आणि अकराव्या घराचा स्वामी शुक्र असून ज्यावेळी शुक्र सिंह राशीत असेल तेव्हा कर्क राशीच्या लोकांच्या मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. तसंच या काळात तुमची धावपळ वाढणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी ताण जाणवणार आहे. तुमच्या कामाचं श्रेय दुसऱ्याला मिळणार आहे. शुक्र संक्रमणाच्या काळात विनाकारण खर्च वाढणार आहे. 

धनु (Sagittarius Zodiac)

शुक्राचं संक्रमण धनु राशीच्या लोकांसाठी एकामागून एक समस्या उभं ठाकणार आहे. तुम्हाला शुक्र संक्रमणाच्या काळात कामाच्या ठिकाणी असंतोष जाणवणार आहे. या काळाततुमचा अतिरिक्त खर्च होणार आहे. तसंच तुम्ही जे काही कमवाल त्याच्यावर विनाकारण खर्च होणार आहे.अशा परिस्थितीत आर्थिक परिस्थिती गडबडणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)