Sankashti Chaturthi 2023 : प्रत्येक शुभ कामाची सुरुवात ही गणरायाचा पूजेने केली जाते. संकष्टी चतुर्थी ही गणरायला समर्पित आहे. आज भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे. पितृपक्ष पंधरवडा सुरु असल्याने आज पितृपक्षातील चतुर्थी श्राद्ध आज केलं जाणार आहे. संकष्टीचं व्रत सूर्योदयापासून सुरु होतं आणि चंद्र दर्शनानंतर समाप्त होतं. अशा या शुभ दिवसाचे शुभ मुहूर्त, पूजा विधीबद्दल जाणून घेऊयात. (sankashti chaturthi 2023 october 02 puja vidhi and shubh muhurat and moon rising time and rahu ketu upay)
संकष्टी चतुर्थीचे व्रत करुन बाप्पाची आराधना केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते आणि व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक संकट दूर होतात, अशी मान्यता आहे.
पंचांगानुसार भाद्रपद कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी 2 ऑक्टोबर 2023 ला सकाळी 07 वाजून 36 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर 03 ऑक्टोबर 2023 ला सकाळी 06 वाजून 11 वाजेपर्यंत असणार आहे. 2 ऑक्टोबर 2023 ला चंद्रोदय (Sankashti Chaturthi 2023 Moon time) रात्री 8 वाजून 5 मिनिटांनी होणार आहे.
सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. यानंतर घरातील मंदिरात दिवा लावून श्रीगणेश आणि सर्व देवी-देवतांना स्नान घालून पूजा करा. बाप्पाला दुर्वा आणि जांस्वदाचे फुलं अर्पण करा. पूजा करताना श्रीगणेशाचे ध्यान करा. त्यानंतर बाप्पाला आवडते मोदक किंवा बुदिंचा लाडू नैवेद्य म्हणून दाखवा. गणरायाची आरती करा आणि संध्याकाळी चंद्र पाहून अर्घ्य देऊन उपवास सोडा.
कुंडलीत राहू-केतू अशुभ असल्यास मानसिक तणाव, आर्थिक नुकसान आणि कुटुंबात कलह वाढतो, असं म्हणतात. म्हणून संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशाला दुर्वाच्या 21 जोड्या अर्पण केल्यास राहुमुळे होणारे दोष दूर होता, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्याशिवाय गरजू व्यक्तीला हिरवा मूग दान करा. तसंच गणेश मंदिरात तुमच्या क्षमतेनुसार वस्तू दान करा. 'श्री गं गणपतये नमः' चा जप केल्यानेही लाभ होतो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)